‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?

टाटा समूह, अदानी आणि हिंदूजा हे एअर इंडियासाठी बोली लावण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात असलं तरी त्यांच्याकडून अधिकृतरित्या तशी माहिती आलेली नाही.

'महाराजा'साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?

नवी दिल्ली: ‘महाराजा’ अर्थात एअर इंडियासाठी (Air India)बोली लावण्याची मुदत आज संपत आहे. अशातच देशातील प्रमुख उद्योग टाटा समूह (Tata Group), अदानी (Adani)आणि हिंदुजा (Hinduja) महाराजाचं ओझं वाहण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सरकारने एअर इंडियासाठी बोली लावणाऱ्यांसाठी इन्टिमेशनची तारीख 29 डिसेंबरवरुन 5 जानेवारी केली आहे. टाटा समूह, अदानी आणि हिंदूजा हे एअर इंडियासाठी बोली लावण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात असलं तरी त्यांच्याकडून अधिकृतरित्या तशी माहिती आलेली नाही. (Tata, Adani, Hinduja likely to bid for Air India)

एअर इंडियाचे कर्मचारीही बोली लावणार

एअर इंडियाचे 209 कर्मचारी एका खासगी फायनान्स कंपनीला सोबत घेऊन बोली लावण्याची तयारी करत असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला बोली लावण्यासाठी 1 लाख रुपयांचं योगदान द्यावं लागणार आहे. दरम्यान, पायलट आणि केबिन क्रूचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनियनने आपले सदस्य आणि कर्मचाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत भाग न घेण्याचा सल्ला दिला आहे. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेचं नेतृत्व एअर इंडियाची कमर्शिअल डायरेक्टर मीनाक्षी मल्लिक करत आहेत.

एअर इंडिया टाटा समुहाचीच निर्मिती

एअर इंडियाचा पाया हा टाटा समुहानेच घातला आहे. जेआरडी टाटा यांनी 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. पुढे 1953 मध्ये भारत सरकारने टाटा सन्सकडून टाटा एअरलाईन्सची मालकी सरकारच्या अखत्यारित आणत त्याचं राष्ट्रीयकरण केलं होतं.

संबंधित बातम्या:

कुणाल कामराचे खोचक ट्विट; अर्णब गोस्वामींना पुन्हा डिवचले

Tata, Adani, Hinduja likely to bid for Air India

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI