Tax Saving Trick : कर वाचविण्यासाठी श्रीमंतांचे फंडे! अशी शोधली पळवाट

Tax Saving Trick : अनेक श्रीमंत, बॉलिवूड स्टार, त्यांची मुलं अचानक शेतीकडे का वळू लागली आहेत बरं, त्यांना खरंच शेती करायची आहे का? का शेतीच्या नावावर काही तरी साध्य करायचं आहे ?

Tax Saving Trick : कर वाचविण्यासाठी श्रीमंतांचे फंडे! अशी शोधली पळवाट
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 3:41 PM

नवी दिल्ली : अनेक श्रीमंत, बॉलिवूड स्टार, त्यांची मुलं अचानक शेतीकडे का वळू लागली आहेत बरं, त्यांना खरंच शेती करायची आहे का? का शेतीच्या नावावर काही तरी साध्य करायचं आहे. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खान याने त्याची मुलगी सुहाना खानच्या (Suhana Khan) नावावर शेती खरेदी केली. या शेतीतील कमाईतून 13 कोटी रुपयांचे घर खरेदी केले. सुहाना खान हिने डेजा वू फॉर्म प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने हे शेत खरेदी केले आहे. ही फर्म शाहरुख खानची सासू आणि मेहुणीच्या नावावर आहे. तर आलिया भट्ट (Alia Bhat) हिने पण 37.8 कोटींचे एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या नावे ही गुंतवणूक करण्यात आली आहे. पण यामागचे गणित नेमकं काय आहे, हे समजल्यावर तुम्हाला धक्का बसेल..

काय आहे कारण बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी कर वाचविण्यासाठी हा फंडा केला आहे. कोणी शेती खरेदी केली. तर कोणी फर्मच्या नावावर संपत्ती खरेदी केली. के. एल. राहुल आणि आतिया शेट्टी यांच्या लग्नात जवळपास 55 कोटींचे गिफ्ट आले. पण त्यावर त्यांना एक रुपया पण कर भरावा लागला नाही. कारण लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंवर भारतात कुठलाही कर आकारल्या जात नाही. त्याचा तपशील ही द्यावा लागत नाही.

आलिया भट्टला दिलासा आलिया भट्टने तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या नावे कोट्यवधींची अपार्टमेंट खरेदी केली. त्यामुळे तिला जवळपास 25 टक्के कर वाचविता आला. स्वतःच्या नावे संपत्ती खरेदी केली असती तर तिला कदाचित कर द्यावा लागला आसता. तसेच महिला खरेदीदार असल्याने तिला एक टक्क्याची अतिरिक्त सवलत मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

बीसीसीआयने केली कमाल भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) आयपीएल राईट्समधून 24,195 कोटी रुपये कमावले. पण क्रिकेट बोर्डाला छदाम पण कर रुपात चुकता करावा लागला नाही. कारण या बोर्डानुसार, ती एक धर्मादाय संस्था आहे. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतात, क्रिकेटला सातत्याने चालना देणे, नवीन खेळाडू तयार करणे आणि इतर कामे करत असल्याने, भारतात क्रिकेट धर्म वाढवत असल्याने ही संस्था कराच्या परीघात येत नसल्याचा बीसीसीआयचा दावा आहे.

मोठा विरोधाभास भारत सरकारने धार्मिक संस्था आणि ट्रस्टला कर परिघातून बाहेर ठेवले आहे. विविध जाती धर्माच्या लाखो धार्मिक स्थळे भारतात आहेत. त्यांना देणगी, पैसा आणि इतर मार्गातून हजारोच नाही तर लाखो रुपये मिळतात. पण त्याचा हिशोब कोणी विचारत नाही आणि त्यांना कर भरावा लागत नाही.

गरीबांकडून कर वसूली देशातील 67 कोटी भारतीय कमकुवत आर्थिक वर्गातून येतात. पण ते विविध 64 टक्के कर भरतात. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीयांनी 14.83 लाख कोटी रुपये कर भरला आहे. भारतातील मध्यमवर्गाने 33 टक्के कर अदा केला आहे. देशातील श्रीमंतांच्या तुलनेत मध्यम आणि गरीब लोक अप्रत्यक्ष कराच्या रुपात 6 पट अधिक कर भरतात.

10 टक्के श्रीमंत इतकाच भरतात कर देशातील लोकसंख्येत श्रीमंत, अति श्रीमंतांचा टक्का कमी, 10 टक्के आहे. त्यांच्याकडे देशातील एकूण संपत्तीचा 77 टक्के वाटा आहे. पण हा वर्ग केवळ 3 टक्केच कर चुकता करतो.

बीसीसीआय करेल मालामाल बीसीसीआयकडून जर कर वसुलीला सुरुवात केली तर केंद्र सरकार एकाच वर्षात इतका कर जमा करेल की, सर्वसामान्य लोकांकडून तो वसूल करण्यासाठी 15 वर्षे लागतील.

असा वाचवितात कर

  • देशातील श्रीमंत व्यक्ती कायद्यातूनच पळवाट काढतात
  • लग्न समारंभातून मिळणाऱ्या भेट वस्तूमधून कर वाचवितात
  • ब्राँड एंडोर्समेंटमधून कर सवलत
  • रोख आणि सोने यामाध्यमातून कर सूट

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.