AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : कुठे स्वस्त, तर इथे झाले महाग, पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पुन्हा एकदा इंधन स्वस्त होण्याचे चॉकलेट दिले. त्यांनी तेल कंपन्यांकडे चेंडू टोलावला आहे. जाणून घ्या पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग

Petrol Diesel Rate Today : कुठे स्वस्त, तर इथे झाले महाग, पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय
आजचा पेट्रोल-डिझेलचा भआव काय
| Updated on: Jun 13, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात सातत्याने घसरणीचे सत्र आहे. गेल्या पाच महिन्यात किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहेत. पण देशात गेल्या 13 महिन्यांत जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही. तेल कंपन्यांचे तोट्याचे रडगाणे थांबविण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भरीव अनुदान दिले. इंधन विक्रीतून तोटा झाल्याची ओरड तेल कंपन्या करत होत्या. तोट्याची भरपाई म्हणून या कंपन्यांना केंद्र सरकारने 30 हजार कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले. अनेक दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किंमतीही आटोक्यात आहेत. मग कंपन्यांना पेट्रोल-डिझेलचे दर कपात (Petrol Diesel Rate Today) करण्यास काय धाड भरली आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

कच्चा तेलात घसरण आज कच्चा तेलातील घसरण कायम आहे. 11 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 72.01डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 67.21 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत.

भाव एका SMS वर

  • भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  • देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  • त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  • पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  • इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  • बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  • त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  • एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  • अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
  • अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  • अमरावतीत पेट्रोल 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  • जळगावमध्ये पेट्रोल 106.15 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  • कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  • नागपूरमध्ये पेट्रोल 106.18 तर डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  • नांदेडमध्ये पेट्रोल 108.48 तर डिझेल 94.94 रुपये प्रति लिटर
  • नाशिकमध्ये पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
  • परभणी पेट्रोल 108.79 तर डिझेल 95.21 रुपये प्रति लिटर
  • पुण्यात पेट्रोलचा भाव 106.01 आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
  • रायगड पेट्रोलचा भाव 105.80 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  • सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.99 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर
  • ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान