Electric Vehicle News | काय तो लूक, काय ती स्टाईल, इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ, विक्री ही एकदम ओक्के मध्ये

Electric Vehicle Sale | इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना घडूनही वाहनांची विक्री कमी न होता वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांनी रॉकेट भरारी घेतली आहे.

Electric Vehicle News | काय तो लूक, काय ती स्टाईल, इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ, विक्री ही एकदम ओक्के मध्ये
ईव्ही विक्रीत वाढ
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jul 17, 2022 | 1:28 PM

Electric Vehicle Record Sale : देशातील तरुण वर्गच नाही तर सर्व वयोगटातील मंडळी इलेक्ट्रिक वाहनांच्या(Electric Vehicle)लूक, कलर आणि स्टाईलवर भाळले आहेत. वजनाने हलक्या असणा-या ईव्हींनी (EV) तरुणींसह सर्वांनाच भूरळ घातली आहे. एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांना आगीच्या घटना वारंवार घडत असताना त्यांच्या विक्रीत कसली ही कमी आलेली नाही. उलट विक्री (Sale) किती तरी पटीने वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांनी देशभरात विक्रीत रेकॉर्डब्रेक (Record Break) केला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांनी तर मोठी झेप घेतली आहे. पर्यायवरण पूरक असल्याने आणि पेट्रोलच्या (Petrol)वाढीव किंमतीला कंटाळलेला एक मोठा वर्ग इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक चारचाकी उत्पादन करणा-या कंपन्यांनी त्यांचे पेट्रोल व्हर्जन बंद करण्याच्या अलिकडे केलेल्या घोषणांनी ही इलेक्ट्रिक चारचाकीच्या विक्रीत वाढ झाली आहे. आता इलेक्ट्रिक वाहन विक्रीत कोणत्या कंपनीने आघाडी घेतली ते पाहुयात.

असा वाढत गेला ग्राफ

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोशिएनने (FADA) दिलेल्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात FY2022 EVs ची 429,217 युनिट्स किरकोळ विक्री झाली. तर गेल्या आर्थिक वर्षात FY2021 134,821 युनिट्सची विक्री झाली होती. तर दोन वर्षांपूर्वी FY2020 मध्ये 168,300 युनिट्सची विक्री झाली होती. दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहीतील (एप्रिल-जून 2022) आकड्यांनी विक्रीचे रेकॉर्ड तोडले आहेत.

दुचाकी विक्रीत कोणाची आघाडी

चारचाकी पेक्षा दुचाकी विक्रीत कमालीची वृद्धी झाली आहे. दुचाकीची मागणी वाढली आहे. दुचाकी विक्रीत वार्षिक 938 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. मासिक विचार करता विक्रीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2021 मध्ये 4,073 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली होती. तर 2022 मध्ये विक्रीचा आकडा झपाझप वाढला आहे. यंदा दुचाकी ईव्हीची 42,260 युनिट्सची विक्री झाली आहे.

दुचाकी विक्रीत ही कंपनी पुढे

हिरो इलेक्ट्रिक कंपनीने 2021 मध्ये 1,200 युनिटची विक्री केली होती. यंदा हा आकडा 6,503 युनिट्सवर पोहचला आहे. तर अँपिअर कंपनीने 2021 मध्ये 268 युनिटची विक्री केली होती. यंदा हा आकडा 6,540 युनिट्सवर पोहचला आहे. अॅथर एनर्जी कंपनीने 2021 मध्ये 319 युनिटची विक्री केली होती. यंदा हा आकडा 1,096 युनिट्सवर गेला आहे. रिव्हॉल्ट कंपनीने 2021 मध्ये केवळ 59 युनिटची विक्री केली होती. यंदा हा आकडा 2,423 युनिट्सवर पोहचला आहे.

हे सुद्धा वाचा

चारचाकीत टाटा आघाडीवर

देशातील इलेक्ट्रिक चारचाकी वाहन विक्रीत अर्थातच टाटा मोटर्सने आघाडी घेतली आहे. भारतात सध्या जेवढ्या इव्ही कारची विक्री करण्यात येत आहेत, त्यात 83.81 टक्के वाटा एकट्या टाटा कंपनीचा आहे. त्यानंतर एमजी मोटर्स आणि ह्युंदाईचा तिसरा क्रमांक लागतो. महिंद्रा कंपनी या स्पर्धेत चौथ्या स्थानी आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें