AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातल्या टॉप-4 इलेक्ट्रिक स्कूटर, फास्ट चार्जिंग आणि 236KM पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज

भारतात सध्या उत्तमोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक उपलब्ध आहेत. त्यापैकी टॉप 4 इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 5:41 PM
Share
प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. भारतात सध्या उत्तमोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक उपलब्ध आहेत. त्यापैकी टॉप 4 इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
Ola S1 Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे. एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.

2 / 5
Simple One : इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप सिंपल एनर्जीने (Simple Energy) ऑगस्ट महिन्यात देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 1.10 लाख रुपये या किंमतीमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 4.8 kWh पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे, या बॅटरीचं वजन 6 किलोपेक्षा जास्त आहे. या स्कूटरच्या डिटॅचेबल आणि पोर्टेबल नेचरमुळे ई-स्कूटरची बॅटरी घरी चार्ज करणे सोपे होईल. साध्या लूप चार्जरने जरी ही स्कूटर चार्ज केली तरी 60 सेकंदांच्या चार्जिंगवर ही स्कूटर 2.5 किमीपर्यंत धावेल. EV कंपनी पुढील तीन ते सात महिन्यांत देशभरात 300 हून अधिक फास्ट चार्जरदेखील स्थापित करेल. ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये इको मोडमध्ये 203 किलोमीटर आणि आयडीसी स्थितीत 236 किलोमीटरची रेंज प्रदान करेल. या स्कूटरचं टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतकं आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रति तास, 0 ते 40 किमी प्रति तास वेग 2.95 सेकंदात धारण करु शकते. स्कूटरला 4.5 KW चे पॉवर आउटपुट आणि 72 Nm चे टॉर्क मिळते.

3 / 5
Okinawa Praise Pro : या स्कूटरमध्ये कंपनीने एक 2.0 Kwh लिथियम-आयन बॅटरी पॅकचा वापर केला आहे. या बॅटरीच्या मदतीने ही इलेक्ट्रिक स्कूटर ईको मोडमध्ये ताशी 40 किमी टॉप स्पीड देते. स्पोर्ट्स मोडमध्ये ही स्कूटर 70 किमी टॉप स्पीडने धावते. Praise Pro चा बॅटरी पॅक एक रिमूव्हेबल यूनिट आहे. यासोबत कंपनी 84V/10A चार्जर देते. या चार्जरच्या मदतीने ही स्कूटर 5 ते 6 तासात पूर्ण चार्ज करता येते. यामधील बॅटरी एका फुल चार्ज झाल्यानंतर 110 किलोमीटरपर्यंत धावते. Okinawa PraisePro स्कूटरची किंमत 79 हजार रुपये (एक्स-शोरुम) इतकी ठेवण्यात आली आहे.

4 / 5
Pure EV Epluto :  प्योर ईव्ही Epluto या स्कूटरची किंमत 71,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. Pure EV Epluto मध्ये एअर कूल्ड इंजिन आहे. तसेच यामध्ये 1800W ची मोटर देण्यात आली आहे. यात फ्रंट डिस्क आणि मागील चाकात ड्रम ब्रेक आहे. तसेच यात ABS, स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर देण्यात आले आहेत.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.