
जेव्हा आपण फिरायला जातो, तेव्हा हॉटेलची बुकिंग जरूर करतो. आपल्या बजेटनुसार हॉटेलचे बुकिंग करण्यात येते. 2000 रुपयांची रूम अथवा जास्तीत जास्त 7-8 हजार रुपयांपर्यंतचे भाडे भरण्याची तयारी काहीची असते. पण जगातील या महागड्या हॉटेलमध्ये थांबण्याचे स्वप्न एकदम महाग आहे. येथील एका रात्रीचे थांबण्यासाठीचे भाडे ऐकूनच अनेकांना घाम फुटतो. अनेक लखपती, करोडपती सुद्धा या हॉटेलमध्ये थांबण्याचा विचार करत नाही. कारण एका रात्रीच्या भाड्यात अनेकांचे बंगल्याचे आणि आलिशान कारचे स्वप्न पुर्ण होऊ शकते. कोणत्या आहेत या महागड्या हॉटेल्स?
1. द एम्पथी सुइट, पाम्स कॅसिनो रिसॉर्ट, लास वेगास यूएस
पाम्स कॅसिनो रिसॉर्ट, लास वेगासपासून 2 किमीवर आहे. येथील कॅसिनो आणि रेस्टॉरंट 24 तास उघडा असतो. ही जगातील सर्वात महागडी हॉटेल मानल्या जाते. येथील सर्वात महागड्या रूमचे भाडे Empathy Suite Sky Villa (एका रात्रीचे भाडे 100,000 डॉलर) 85,93,339 लाख इतके आहे. हे हॉटेल ब्रिटिश आर्टिस्ट डेमियन हर्स्ट यांनी तयार केले. यामध्ये दोन मास्टर बेडरूम, मसाज टेबल, सॉल्ट रिलॅक्सेशन रुम आणि स्ट्रिप व्यू झकुजीचा समावेश आहे.
2. रॉयल पेंटहाउस सुइट, हॉटल प्रेसिडेंट विल्सन, जिनिव्हा, स्वित्झर्लंड
हॉटेल प्रेसिडेंट विल्सन, जिनिव्हा, हे हॉटेल जणू एखाद्या सौंदर्याच्या खाणीत वसलेले आहे, असा भास होतो. या हॉटेलमध्ये 226 मध्ये सुंदर कमरे आहेत. येथून जिनिव्हा शहर आणि निसर्गाचे सौंदर्य दिसते. येथील सर्वात महागडा सूट Royal Penthouse Suite (एका रात्रीचे भाडे 80,000 डॉलर ) इतके आहे. हा सूट 8 व्या मजल्यावर आहे.
3. द मार्क पेंटहाऊस सुइट, द मार्क हॉटल, न्यूयॉर्क
द मार्क हॉटेल, न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील सर्वात आलिशान परिसरात आहे. हे हॉटेल अप्पर ईस्ट परिसरात आहे. हॉटेलमध्ये जुन्या सह आधुनिक डिझाईनचा अनोखा मिलाफ दिसून येतो. फ्रेंच डिझायनर जॅक्स ग्रांज यांनी त्याचे डिझाईन केले आहे. येथील महागडा सूट Mark Penthouse Suite ( एका रात्रीचे 75,000 डॉलर) आहे. हा अमेरिकेतील सर्वात मोठा आणि महागडा हॉटेल सूट मानल्या जातो.
4. द मुरका सुइट, कॉनराड मालदीव
द मुराका, कॉनराड हे मालदीवमधील जगातील पहिले अंडरवॉटर हॉटेल आहे. पाण्याखालील असलेल्या या हॉटेलचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. या हॉटेलचा अर्धा भाग पाण्याखाली आहे. सन डेक, दोन बेडरूम आहे. या हॉटेलचा अर्धा भाग पाण्याखाली आहे, तिथे राहण्याचे खास आकर्षण आहे. येथे एका रात्री राहण्याचे 60,000 डॉलर भाडे आहे.
5. द पेंटहाउस सुइट, होटल मार्टिनेज, कान्स फ्रान्स
हॉटेल मार्टिनेज, हे हॉटेल फ्रेंच रिव्हिएरा येथे स्थित आहे. 1920 मध्ये रॉयल आणि आर्ट डेको स्टाईल आहे. यामध्ये 409 रुम आहेत. La Palme d’Or नावाचे दोन स्टार रेस्टारंट आहे. Penthouse Suite याचे एका रात्रीचे भाडे 55,000 डॉलर इतके आहे.