AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले, काय आहेत आजचे भाव, जाणून घ्या

Gold rate today: आज सकाळी बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली. गेल्या दरापेक्षा आज सोने आणि चांदी स्वस्त झाले.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले, काय आहेत आजचे भाव, जाणून घ्या
800 रुपयांची वाढImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 20, 2022 | 3:28 PM
Share

Gold Silver Rate Today | आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या चांदीत घसरणीचे सत्र सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा बुधवारी सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver rate today)घसरण झाली.डॉलरची स्थिती मजबूत झाल्याने सोन्यासह चांदीवर दबाव दिसून आला. सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सोमवारी संध्याकाळी सोन्या-चांदीच्या दरापेक्षा बुधवारी भावात फरक होता. 20 जुलैच्या सकाळी 999 शुद्ध(Pure) सोने प्रति 10 ग्रॅम 50,477 रुपयांना विक्री होत होते. तर 999 शुद्ध चांदीचा दर प्रति किलो 55,230 रुपये होता. ibjarates नुसार, 995 शुद्ध सोने प्रति 10 ग्रॅम 50,275 रुपयांना विक्री होत होते. तर 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याच भाव 46,237 रुपये होता. याशिवाय 750 शुद्ध सोन्याचा भाव 37,858 रुपये होता. 585 शुद्ध 10 ग्रॅम सोने 29,529 रुपयांना विक्री होत होते. तर 999 शुद्ध चांदीचा दर प्रति किलो 55,230 रुपये होता. डॉलर (Dollar) मजबूत स्थिती असल्यामुळे सोन्या चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या काळात सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वायदे बाजारात आणि सराफा बाजारात या दोन्हींमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,520 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,200 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,610 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,390 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,610 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,390 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,390 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,610 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति 10 ग्रॅम 559 रुपये होता.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?