Gold Silver Price Today News | कमकुवत डॉलरचा परिणाम, सोने-चांदीच्या दरात वाढ, काय आहेत आजचे दर?

| Updated on: Jul 26, 2022 | 12:28 PM

Gold rate today: डॉलर घसरल्याने सोने आणि चांदीत आज तेजी परत आली. गेल्या शुक्रवारपासून सोन्या-चांदीचे दर वाढलेले होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी या किंमतीत मामूली घसरण झाली होती.

Gold Silver Price Today News | कमकुवत डॉलरचा परिणाम, सोने-चांदीच्या दरात वाढ, काय आहेत आजचे दर?
आजचे सोने चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Gold Silver Price Today News | कमकुवत डॉलरच्या(Week Dollar) पार्श्वभूमीवर मंगळवारी 26 जुलै 2022 रोजी, सोन्याच्या भावात (Gold Rate News) वाढ झाली. परंतु आता गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या संभाव्य आक्रमक व्याजदरवाढीकडे (Interest Rate) लक्ष लागले आहे. त्यामुळे सोन्यात हवी तशी तेजी दिसून येत नाही. 0311 जीएमटीच्या तुलनेत स्पॉट गोल्ड 0.3% वाढून 1,724.45 डॉलर प्रति औंसवर आहे. अमेरिकी सोने वायदे बाजार 0.3% वधारुन 1,723.60 डॉलर प्रति औंस झाले आहे. डॉलर सलग चौथ्या सत्रात घसरला आहे. डॉलर 0.2% घसरल्याने सोन्याचे भाव खाली आले. अमेरिकेने फेडरल रिझर्व्ह बँकेच्या (American Federal Reserve) धोरणावर आता सोन्याचे भाव अवलंबून राहतील. बाजारात बँकेच्या धोरणाची प्रतिक्षा आहे. त्यानंतर सोन्याच्या किंमतीवर (Gold Price Today) त्याचा परिणाम दिसून येईल. भारतीय बाजारात मात्र सोन्यात ज्याप्रमाणात घसरण व्हायला हवी तेवढी दिसून येत नाही. बाजार भाव कमी जास्त होत आहेत. गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली होती. त्यानंतर शु्कवारपासून मात्र सोन्याच्या भावात वाढ झाली.

आता फैसला उद्या

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर डॉलर कमकुवत झाला आहे. या किंमतीवर आता अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाचा स्पष्ट परिणाम दिसून आला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी होणाऱ्या धोरणात्मक बैठकीच्या समारोपप्रसंगी व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सची वाढ अपेक्षित आहे. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येईल.

 

हे सुद्धा वाचा

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,160 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 549 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.