हजारो करोडची आहे या ‘पान मसाल्या’ ची उलाढाल; जाहिरातीसाठी ‘स्टार्स अभिनेत्यां’मध्येही लागते स्पर्धा…!

अजय देवगण आणि शाहरुख खाननंतर अक्षय कुमार आता ‘विमल इलायची’ च्या जाहिरातीत दिसतो आहे. एका उत्पादनाच्या जाहिरातीत बॉलीवूडचे तीन ‘मेगास्टार’ एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र सोशल मीडियावर चाहत्यांच्या संतापाचा परिणाम असा झाला की, अक्षय कुमारने या जाहिरातीतून काढता पाय घेत, त्याबद्दल माफीही मागितली.

हजारो करोडची आहे या ‘पान मसाल्या’ ची उलाढाल; जाहिरातीसाठी ‘स्टार्स अभिनेत्यां’मध्येही लागते स्पर्धा…!
पानमसाल्याच्या जाहिरातीसाठी ‘स्टार्स अभिनेत्यां’मध्येही लागते स्पर्धाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:44 AM

पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल एखाद्या अभिनेत्याला माफी मागावी (Apologies) लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑक्टोबर 2016 मध्ये हॉलिवूड अभिनेता पियर्स ब्रॉसननला ‘पान बहार’ ची जाहिरात ‘जेम्स बाँड’ म्हणून केल्याबद्दल माफी मागावी लागली होती. तेव्हा त्यामध्ये तंबाखू किंवा सुपारी (Tobacco or betel nut) असल्याचे सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. नंतर हा वाद इतका वाढला की केंद्र सरकारने या जाहिरातीवर बंदी घातली. मोठा प्रश्न असा आहे की, ‘पान मसाल्या’चा व्यवसाय देशात किती मोठा आहे की कंपन्या आपल्या ‘ब्रँड’ साठी एवढ्या मोठ्या स्टार्सना साईन करू शकतात? भारतात तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिराती (Product advertisements) दाखवण्यावर बंदी आहे. मात्र, पान मसाला बनवणाऱ्या कंपन्या माऊथ फ्रेशनर, वेलची म्हणून त्याची जाहिरात करतात. माऊथ फ्रेशनर, वेलची अशी जाहिरात करून कंपन्या आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवतात. वास्तवात, भारतात पान मसाला आणि गुटख्याचा व्यवसाय हजारो कोटींचा आहे. मार्केट रिसर्च फर्म imarc च्या मते, 2021 मध्ये भारतातील पान मसाला मार्केट 41,821 कोटी रुपये होते. ही रक्कम 2027 पर्यंत 53 हजार कोटी रुपयांच्या पुढेही जाऊ शकते. (The turnover of this Paan Masalaya is thousands of crores Competition for Stars Actors for advertising)

खाणाऱ्यांचे जग झाले ‘उद्ध्वस्त’

पान मसाल्याच्या टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींमध्ये ते खाणारे अतिशीय श्रीमंत घरातील, घोड्यावर, गाडीवर फिरणारे आणि आलिशान बंगल्यात राहणारे असतात. मात्र, ते रोज खाणाऱ्यांचे आयुष्य ‘उद्ध्वस्त’ होते हे सत्य आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात 27 कोटींहून अधिक लोक तंबाखूचे सेवन करतात. तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात तंबाखू आणि सिगारेटमुळे दररोज 3,500 लोकांचा मृत्यू होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS – 5) नुसार, शहरी भागातील 29% पुरुष आणि ग्रामीण भागातील 43% पुरुष तंबाखू चघळतात. त्याच वेळी, खेड्यांमध्ये राहणाऱ्या 11% आणि शहरांमध्ये राहणाऱ्या 5% स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात. डब्ल्यूएचओच्या जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणातील डेटा दर्शवितो की भारतातील लोक वयाच्या 17 व्या वर्षापासून तंबाखूचे सेवन करण्यास सुरवात करतात. या सर्वेक्षणानुसार, तोंडाच्या कर्करोगामुळे भारतात दरवर्षी 1 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, ज्याचे मुख्य कारण तंबाखू आहे.

पण विक्रेत्यांचे जग आहे ‘आलिशान’

पान मसाला खाणाऱ्यांचे आयुष्य ‘वाया’ जाईल, पण बनवणाऱ्या आणि विकणाऱ्यांचे आयुष्य ‘आलिशान’ आहे. Manikchand Group RMD पान मसाला बनवते. या ग्रुपची स्थापना पुण्यातील शिरूर येथील रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांनी केली होती. आज माणिकचंद समूहाची उत्पादने 30 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. विमल पान मसाला देखील माणिकचंद ग्रुपशी संबंधित आहे. हे माणिकचंद यांच्याशी संलग्न असलेल्या व्हीएनएस प्रॉडक्ट्स लिमिटेडद्वारे उत्पादित केले जाते. 1929 मध्ये धरमपाल आणि त्यांचा मुलगा सत्यपाल यांनी मिळून धरमपाल सत्यपाल ग्रुपची स्थापना केली. प्रियांका चोप्रा आणि पियर्स ब्रॉसनन सारखे स्टार ट्यूबरोजच्या जाहिरातींमध्ये दिसले आहेत. पान पराग हा वेगळा ब्रँड आहे. कोठारी प्रायव्हेट लिमिटेड ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे जी 1983 मध्ये नोंदणीकृत झाली होती. 80 आणि 90 च्या दशकात पान परागच्या जाहिरातीत बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी दिसले. ज्या काळात टीव्ही घरोघरी पोहोचायलाही सुरुवात झाली नव्हती, तेव्हा पान परागच्या जाहिरातींमध्ये शम्मी कपूर आणि अशोक कुमार सारखे सेलिब्रिटी दिसले होते.

छाप्यांमध्ये सापडले कोट्यवधी रुपये

डिसेंबर 2021 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कानपूरमधील परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या जागेवर छापा टाकला. त्याच्याकडून 177 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पियुष जैन परफ्युमच्या व्यवसायासोबतच पान मसाल्याच्या व्यवसायाशी संबंधित होते. जानेवारी 2022 मध्ये अभिनेता-निर्माता सचिन जोशी यांची 410 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सचिन जोशी हा गुटखा आणि पान मसाला निर्माता जेएमजे ग्रुपचे प्रवर्तक जेएम जोशी यांचा मुलगा आहे. डिसेंबर 2021 मध्येच, शीखर पान मसाला बनवणाऱ्या कानपूरस्थित कंपनी त्रिमूर्ती फ्रॅग्रन्सेसवर छापा टाकून 150 कोटी जप्त करण्यात आले होते. (The turnover of this Paan Masalaya is thousands of crores Competition for Stars Actors for advertising)

इतर बातम्या

SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 874 अंकांनी वधारला

Rakesh Jhujhunwala : राकेश झुनझुनवालांनी ‘सेल’मधील हिस्सेदारी विकली, आयनॉक्स विंडच्या शेअर्समध्ये घसरण

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.