AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakesh Jhujhunwala : राकेश झुनझुनवालांनी ‘सेल’मधील हिस्सेदारी विकली, आयनॉक्स विंडच्या शेअर्समध्ये घसरण

राकेश झुनझुनवाला यांचे नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये नाही. ही बातमी समोर आल्यानंतर बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Rakesh Jhujhunwala : राकेश झुनझुनवालांनी 'सेल'मधील हिस्सेदारी विकली, आयनॉक्स विंडच्या शेअर्समध्ये घसरण
राकेश झुनझुनवालाImage Credit source: tv9
| Updated on: Apr 21, 2022 | 1:52 PM
Share

मुंबई : राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhujhunwala) यांच्याकडे यापूर्वी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (SAIL) 1.1 टक्के हिस्सा होता. मार्च तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला यांचे नाव ‘सेल’च्या भागधारकांच्या यादीत नव्हतं. कंपन्या सहसा शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये शेअरहोल्डरचे नाव लिहितात ज्यांचा कंपनीमध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. याचा अर्थ असा की,  राकेश झुनझुनवाला यांचे नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये (shares) नाही. त्यामुळे ही बातमी समोर आल्यानंतर बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण झाली. स्टॉक मार्केटमधील अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मार्च तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये भरपूर बदल केले आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमधील आपली हिस्सेदारी विकली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या मार्च तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटा समोर आल्यानंतर ही माहिती मिळाली आहे.

विंडच्या समभागांमध्ये घसरण

बुधवारच्या व्यवहारात आयनॉक्स विंडच्या समभागांनी 4 टक्क्यांची घसरण झाली. कंपनीने जाहीर केले आहे की ते प्रीपेरेटरी इश्यू आणि कन्व्हर्टेबल वॉरंटद्वारे 402 कोटी रुपये उभे करण्याचा विचार करत आहेत.

आयनॉक्स विंडनं काय म्हटलंय?

आयनॉक्स विंडने म्हटले आहे, कंपनीमध्ये 150 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.  एक विदेशी कंपनी सामना ग्रीन कंपनीमध्ये 152.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जमीन भाडेतत्त्वावरील कंपनी आयनॉक्स विंडमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आयनॉक्स विंड त्याचे शेअर्स 126च्या किमतीला आणि वॉरंट 122 ला जारी करत आहे. दुसरीकडे PSP प्रोजेक्टने म्हटलं आहे की त्यांना 938 कोटी रुपयांच्या नवीन वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. यामध्ये 511 कोटी रुपयांच्या नवीन कार्यादेशांचा समावेश आहे. कंपनीला अहमदाबादमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी 503 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे. तर 2021-22 साठी 327 च्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर पीएसपी प्रोजेक्टच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

इतर बातम्या

Bhonga: आता थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा

Amravati | पिसाळलेला कुत्रा शोधा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा; अमरावतीत बळवंत वानखडेंनी कुणावर केली बोचरी टीका?

Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.