AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक-दोन नाही तर 10 सरकारी बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज; जाणून घ्या 30 लाखांसाठी किती EMI भरावा लागेल

काही सरकारी बँका या 8% पेक्षा कमी व्याजदरावर गृहकर्ज देत आहेत. रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी केल्यानंतर कर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत. व्याजदरात कपात झाल्यामुळे ईएमआयदेखील कमी झाला आहे.

एक-दोन नाही तर 10 सरकारी बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज; जाणून घ्या 30 लाखांसाठी किती EMI भरावा लागेल
गृहकर्ज होणार स्वस्तImage Credit source: गुगल
| Updated on: May 18, 2025 | 3:32 PM
Share

तुम्ही जर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. व्याजदर कमी करण्याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेनं दोन हप्त्यांमध्ये एकूण 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यामुळे रेपो रेट 6.5% वरून 6% पर्यंत कमी झाला आहे. यामुळेच गृहकर्जाचे व्याजदर 8 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. अनेक सरकारी बँका 8 टक्के किंवा त्यापेक्षा कमी दराने गृहकर्ज देत आहेत. 9 मे 2025 पर्यंत बँकांनी फ्लोटिंग-रेट गृहकर्जांवरील हे सर्वांत कमी व्याजदर दिले आहेत. हे व्याजदर फक्त पात्र कर्जदारांसाठी आहेत. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला समान व्याजदर मिळेल हे सांगता येत नाही. क्रेडिट हिस्ट्री, कमाई या घटकांवर अवलंबून व्याजदरदेखील बदलू शकतो.

किती EMI भरावा लागेल?

दहा अशा सरकारी बँका आहेत, जे 7.80% ते 8% व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. जर तुम्ही या बँकांकडून 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं तर EMI खालीलप्रमाणे असेल.

  • कॅनरा बँक 7.80% व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं तर त्याचा ईएमआय 24,720 रुपये असेल.
  • बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक हे 7.85% दराने गृहकर्ज देत आहेत. जर तुम्ही या बँकांकडून 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं तर ईएमआय 24,810 रुपये असेल.
  • इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक 7.9% व्याजदराने गृहकर्ज देत असून तुम्ही या बँकांकडून 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं तर ईएमआय 24,900 रुपये असेल.
  • बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक 8% व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. जर तुम्ही या बँकांकडून 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं तर ईएमआय 25,080 रुपये असेल.

कमी व्याजदर कसा मिळवायचा?

तुम्ही कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहात की नाही हे क्रेडिट स्कोअरद्वारे तपासलं जातं. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकतं. कर्जाच्या रकमेचा व्याजदरावरदेखील परिणाम होतो. सर्वसाधारणपे मोठ्या कर्जाच्या रकमेवर जास्त व्याजदर लावला जाऊ शकतो. मालमत्तेचं स्थानदेखील महत्त्वाचं ठरतं. जर तुमची मालमत्ता एखाद्या प्राइम एरियामध्ये असेल तर तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.