AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Funds Investment : छोटा पॅकेट बडा धमाका! मिळेल जोरदार परतावा, तुम्ही गुंतवणूक केली का?

Mutual Funds Investment : स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स इक्विटी स्कीम या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. स्मॉल कॅप फंड खूप चांगला आहे. या फंड्सने गुंतवणूकदारांना तीनच वर्षांत 63.17 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Mutual Funds Investment : छोटा पॅकेट बडा धमाका! मिळेल जोरदार परतावा, तुम्ही गुंतवणूक केली का?
| Updated on: Mar 17, 2023 | 7:25 PM
Share

नवी दिल्ली : स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स इक्विटी स्कीम (Small Cap Mutual Funds Equity Scheme) आहे. हे फंड्स मुख्यतः छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. स्मॉल कॅप फंड्सची कामगिरी एकदम जोरात आहे. या फंड्सने गेल्या तीन वर्षांत 63.17 टक्क्यांचा परतावा दिला आहे. सिक्युरिटीज ॲड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मार्गदर्शक तत्वानुसार, स्मॉल कॅप फंड पोर्टफोलिओत स्मॉल कॅप कंपन्यांचे कमीत कमी 65 टक्के सहभाग असावा. एकूण बाजार भांडवलाच्या 250 हून अधिक कंपन्या आहेत. AMFI वा सेबी ही यादी अद्ययावत करते. गुंतवणुकीची रणनीती, अधिकची एसआयपी (SIP) करणे हे तुमच्या फायद्याचे ठरु शकते. त्यातून अधिकचा परतावा मिळू शकतो. बेस्ट म्युच्युअल फंड निवडल्यास लवकरच पैसा डबल आणि तिप्पट होऊ शकतो.

रिस्क रिटर्न बाबतीत, स्मॉल कॅप फंड्समध्ये जोखीम जास्त असते. स्मॉल कॅप शेअरमध्ये जास्त चढउतार होतो. जेव्हा बाजाराची परिस्थिती चांगली असते. तेव्हा हे फंड जादा परतावा देतो. पण बाजारात पडझड होते. तेव्हा तुम्ही जर या फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला तोटा होतो. पण तुम्ही सलग गुंतवणूक केली तर ज्यावेळी बाजारात तेजीचे सत्र येते, त्यावेळी तुम्हाला जोरदार फायदा होतो.

म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करायची असेल तर डोळे झाकून गुंतवणूक केल्याने लगेच फायद्याचे गणित जुळत नाही. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Funds) करणे कधी ही फायदेशीर ठरते. तुमच्या गुंतवणुकीवर कमीत कमी 12 टक्के परतावा मिळतोच. पण योग्य नियोजन केल्यास, योग्य फंड निवडल्यास तुम्हाला अधिकचा परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीची रणनीती, अधिकची एसआयपी (SIP) करणे हे तुमच्या फायद्याचे ठरु शकते. त्यातून अधिकचा परतावा मिळू शकतो. बेस्ट म्युच्युअल फंड निवडल्यास लवकरच पैसा डबल आणि तिप्पट होऊ शकतो.

  1. Quant स्मॉल कॅप फंडने 222.83 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
  2. Nippon इंडिया स्मॉल कॅप फंडने गुंतवणूकदारांना 152.09 रिटर्न दिला आहे.
  3. Canara Robeco स्मॉल कॅप फंडने 125.25 टक्क्यांचा परतावा दिला.
  4. Tata Small Cap Fund ने गुंतवणूकदारांना 116.69 टक्क्यांचा परतावा दिला.
  5. HSBC स्मॉल कॅप फंडने 126.35 टक्के रिटर्न दिला.

एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिकत्तम म्युच्युअल फंड स्कीम ओपन एंडेड असतात. ओपन एंडेड म्युच्युअल फंड स्कीममधून केव्हा पण रक्कम काढता येते. काही प्रमाणात रक्कम काढता येईल. स्कीमनुसार एक्झिट लोड द्यावा लागतो. तशी ही रक्कम फार कमी असते.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?