AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आहेत बेस्ट सरकारी बचत योजना, FD हून होणार बक्कळ कमाई

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास सर्वात सुरक्षित मानले जात असले तरी रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये कपात केल्यानंतर आता एफडीमध्ये जास्त फायदा मिळत नाही. त्यामुळे आणखी काही सरकारी योजना आहेत. ज्यात जादा परतावा मिळत आहे त्या कोणत्या ते पाहूयात....

या आहेत बेस्ट सरकारी बचत योजना, FD हून होणार बक्कळ कमाई
| Updated on: Jul 01, 2025 | 4:05 PM
Share

एफडीमध्ये गुंतवणूक इतर योजनांच्या तुलनेत नेहमीच सुरक्षित मानली जाते. परंतू  भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केलीय तेव्हापासून देशातील सर्व मोठ्या बँकांनी एफडी रेट्समध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. एफडीमधून लोकांना मिळणारा फायदा कमी झाला आहे. परंतू, जर तुम्हाला सुरक्षित जागी गुंतवणूक करायची असेल तर काही सरकारी स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय आहेत. ज्यात झिरो रिस्क आहे आणि निश्चित परतावा आहे.

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र भारत सरकारची एक बचत योजना आहे. ज्यात ७.५ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेची खास बाब म्हणजे यात गुंतवलेली रक्कम ११५ महिन्यात ( ९ वर्षे ७ महिने ) दुप्पट होते. हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय असून त्यात परताव्याची गॅरंटी आहे. या योजनेत किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमाल रकमेची मर्यादा नाही. यात आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट आहे. अधिक माहीतीसाठी तुम्ही पोस्टात वा कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवर या संदर्भातील माहीती वाचू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धि योजना भारत सरकारची एक बचत योजना आहे.यात कन्येच्या भविष्यासाठी पैसा गुंतवता येतो. मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी यात पैसा गुंतवता येतो. या स्कीममध्ये १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांचे पालक काढू शकतात. यात वर्षाला किमान २५० रुपयापासून कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत जमा करता येते. यासाठी खाते बँकेत वा पोस्टात काढता येते. योजनेची परिपक्वता कालावधी मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत वा १८ वर्षांच्या वयानंतर लग्न होईपर्यंत आहे. आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये ७.४ टक्के व्याज दरावर गुंतवणूकदाराला परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. यात किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. आणि १००० रुपयांच्या पटीत रक्कम गुंतवता येते. सिंगल अकाऊंटसाठी कमाल मर्यादा ९ लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटसाठी १५ लाख रुपयांची मर्यादा आहे.

नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये ७.७% वार्षिक व्याज दर मिळत आहे. या योजनेची परिपक्वता काळ ५ वर्षांचा आहे. यात किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमाल मर्यादा नाही. NSC मध्ये मिळणाऱ्या व्याजावर आयकर द्यावा लागतो.

सिनिअर सिटीझन सेव्हींग स्कीम (SCSS)

ही योजना निवृत्तीनंतर वरिष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आहे. यात ८.२ टक्के असा आकर्षक व्याज दर मिळतो. ६० वर्षांहून अधिक वयोगटाच्या लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. किमान जमा रक्कम १००० रुपये आणि कमाल ३० लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. यात देखील आयकर अधिनियम कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सुट मिळते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.