ही सिमेंट कंपनी आणत आहे 5000 कोटी रुपयांचा आयपीओ, आपल्यासाठी कमाईची उत्तम संधी

| Updated on: May 07, 2021 | 3:09 PM

याआधी 2007 साली बुरानपूर सिमेंट कंपनी आयपीओमध्ये नोंदली गेली. त्याच वर्षी बिनानी आणि बराक व्हॅली या आणखी दोन सिमेंट कंपन्यांची आयपीओमध्ये नोंद झाली. (This cement company is bringing an IPO of Rs 5000 crore, a great earning opportunity for you)

ही सिमेंट कंपनी आणत आहे 5000 कोटी रुपयांचा आयपीओ, आपल्यासाठी कमाईची उत्तम संधी
Follow us on

नवी दिल्ली : प्रसिद्ध डिटर्जंट कंपनी निरमा लवकरच आपल्या सिमेंट युनिट नुवोको व्हिस्टास कॉर्पोरेशन लिमिटेडचा आयपीओ बाजारात आणणार आहे. यासंदर्भात, कंपनीने गुरुवारी सेबीला एक मसुदा सादर केला. कंपनी या माध्यमातून 5000 कोटी रुपये जमा करेल. एखादी सिमेंट कंपनी आयपीओमध्ये लिस्टेड होण्याची 14 वर्षांतील पहिलीच घटना आहे. याआधी 2007 साली बुरानपूर सिमेंट कंपनी आयपीओमध्ये नोंदली गेली. त्याच वर्षी बिनानी आणि बराक व्हॅली या आणखी दोन सिमेंट कंपन्यांची आयपीओमध्ये नोंद झाली. (This cement company is bringing an IPO of Rs 5000 crore, a great earning opportunity for you)

नुवोको व्हिस्टास कंपनीचे मूल्यांकन सध्या 40 हजार कोटी रुपये आहे. सिमेंट कंपनीचा आयपीओ बर्‍याच कालावधीनंतर येत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. तज्ज्ञांच्या मते, निरमा कंपनीची युनिट असल्याने याचा फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करुन चांगले पैसे मिळवू शकतात. डीआरएचपीच्या मते, ते प्राथमिक घटक म्हणून 1,500 कोटी रुपये, तर दुय्यम घटक म्हणून 3,500 कोटी रुपये उभे करेल.

नुवोकोची क्षमता 2 दशलक्ष टन

नुवोकोची वार्षिक क्षमता 2 दशलक्ष टन आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या कंपनीच्या अहवालानुसार त्यांच्याकडे 7 सिमेंट प्लान्ट आणि 60 रेडी मिक्स कॉंक्रिट प्लान्ट आहेत. पूर्व आणि उत्तर भारतात त्याचा व्यवसाय अधिक आहे. करसन भाई पटेल यांचा मुलगा हिरेन पटेल सध्या नुवोकोचे अध्यक्ष आहेत. गत आर्थिक वर्ष 2019-20 मधील नुवोकोचा महसूल 6,793 कोटी रुपये आहे.

9 वर्षांपूर्वी केले होते डिलिस्ट

उद्योग समूह करसनभाई पटेल यांनी निरमा ग्रुपची सुरूवात केली. हा त्या काळातील एक प्रसिद्ध ब्रँड होता. पण 2012 मध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये ते सूचीबद्ध केले गेले. आता जवळपास 14 वर्षांनंतर निरमा आपले सिमेंट युनिट आयपीओ स्टॉक एक्सचेंजमध्ये लाँच करणार आहे. आयपी जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या शेवटी येण्याची अपेक्षा आहे. (This cement company is bringing an IPO of Rs 5000 crore, a great earning opportunity for you)

इतर बातम्या

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार

बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, अजित पवारांकडून पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम तयारीचा आढावा