AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 जानेवारीपासून बदलतील हे नियम; तुमच्या खिशावर पडेल ताण

New Year | नवीन वर्षात अनेक बदल होत आहे. लोकसभा निवडणूक आणि विधानसभेचा रणसंग्राम 2024 मध्येच होत आहे. सिम कार्ड, GST पासून तर इतर अनेक अपडेट समोर येत आहे. एकूण 1 जानेवारीपासून हे बदल होणार आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून ते कारच्या किंमतीपर्यंत अनेक बदल होतील.

1 जानेवारीपासून बदलतील हे नियम; तुमच्या खिशावर पडेल ताण
| Updated on: Dec 30, 2023 | 2:45 PM
Share

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरु आहे. अशावेळी काही बदल होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेचा रणसंग्राम पण 2024 मध्ये होतील. याशिवाय सिम कार्ड आणि GST सह अनेक बदलांची नांदी आहे. एकूणच 1 जानेवारी 2024 पासून अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचा ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

1 जानेवारीपासून बदलतील हे नियम

  1. UPI डिएक्टिव्हिट होईल – 1 जानेवारीपासून 1 वर्षांपासून बंद असलेली UPI खाती बंद होतील. बँका, पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारखी थर्ड पार्टी एप्स पण 1 जानेवारीपासून युपीआय आयडी इनएक्टिव्ह होतील. ज्या युपीआय आयडीवर एक वर्षापासून कोणताच व्यवहार झाला नाही, ती खाती बंद होतील.
  2. सिम कार्डचे बदलले नियम – 1 जानेवारीपासून सिम खरेदीसाठी नियमात बदल होईल. त्यासाठी डिजिटल KYC करणे अनिवार्य आहे. दूरसंचार विभागाने कागदोपत्री केवायसी करणे बंद केल्याने ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करावी लागेल.
  3. ITR फायलिंग – 1 जानेवारीपासून ITR फायलिंगसाठी दंड द्यावा लागू शकतो. 31 डिसेंबर रोजी बिलेटेड ITR रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास 1 जानेवारीपासून त्यावर दंड आकारल्या जाईल.
  4. डीमॅट खात्यात वारसदार – म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यात वारसाचे नाव जोडावे लागणार आहे. त्यासाठीची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता ही मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  5. गॅस सिलेंडरचा भाव – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचा भाव निश्चित करण्यात येतो. अशावेळी वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना पहिल्या दिवशी खिसा कापला जाणार की बचत होणार हे कळते.
  6. वाहन होणार महाग – 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार किंमतीत वाढ होईल. कंपन्यांनी त्यांची अनेक मॉडेल्सच्या किंमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आलिशान कारचा पण यात समावेश आहे.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.