5

Penny Stocks : शेअर बाजारात हे छोटूराम करतील धमाल, कोणते आहेत हे पेनी स्टॉक

Penny Stocks : शेअर बाजारात हे छोटूराम शेअर कमाल करण्याची शक्यता आहे. या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे असे भाकित बाजारातील तज्ज्ञांनी केले आहे. कोणते आहेत हे छोटूराम

Penny Stocks : शेअर बाजारात हे छोटूराम करतील धमाल, कोणते आहेत हे पेनी स्टॉक
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 2:25 PM

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : शेअर बाजार (Share Market) सातत्याने आगेकूच करत आहे. निफ्टीने 20000 अंकाचा टप्पा ओलांडला. बाजार नवनवीन रेकॉर्ड करत आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 047 टक्क्यांनी वधारला. बीएसईने 67,927 अंकांचा नवीन टप्पा गाठला आहे. तर निफ्टीने (Nifty) 0.44 टक्क्यांची वाढ नोंदवली. निफ्टीने 20,222 अंकाची कामगिरी नोंदवली. निफ्टी मिडकॅपने 0.28 टक्क्यांची वाढ झाली तर निफ्टी स्मॉलकॅपने 0.41 टक्क्यांची वाढ झाली. बाजारातील दिग्गज स्टॉक चमकदार कामगिरी बजावत असताना पेनी शेअरने (Penny Stock) पण जोरदार कामगिरी बजावली आहे. सोमवारी 18 सप्टेंबर 2023 रोजी हे स्टॉक चांगला परतावा देण्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांचा आहे. कोणते आहेत हे छोटूराम शेअर?

या कंपन्यांनी गाजवला दिवस

निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी एनर्जी, निफ्टी रिअॅल्टी यांनी चांगला परतावा दिला. तर निफ्टी 50 इंडेक्समधील दिग्गज बजाज ऑटो, भारती एअरटेल, एमअँडएम, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांना मोठी झेप घेता आली नाही. शुक्रवारी या कंपन्या लाल रंगात न्हाल्या. 1052 स्टॉक आघाडीवर होते. तर 945 शेअरला कामगिरी बजावता आली नाही.

हे सुद्धा वाचा

या पेनी स्टॉकवर ठेवा लक्ष

  1. Brightcom Group – ब्राईटकॉम ग्रुपमध्ये मोठी घडामोड दिसून आली. हा शेअर शुक्रवारी चांगलाच वधारला. या शेअरमध्ये 5 टक्क्यांचे अप्पर लिमिट लागले. एनएसईवर हा शेअर 17.50 रुपयांवर ट्रेड करत होता. ही एक डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. तिचा कारभार जगभर पसरला आहे.
  2. Tirupati Forge – या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. या शेअरमध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. हा शेअर NSE वर 11.20 रुपयांवर ट्रेड करत होता. ही कंपनी ऑटो क्षेत्रात काम करते. कार्बन स्टीलची उत्पादने तयार करते.
  3. Indbank Merchant Banking Services – या शेअरमध्ये पण मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. या शेअरमध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. एनएसईवर हा शेअर 4.45 रुपयांवर ट्रेड करत होता. इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस ही व्यापारी बँका, स्टॉक ब्रोकिंग आणि यासंबंधीच्या सेवा पुरवते.

या शेअरने पण दाखवली कमाल

अल्फास इंडस्ट्रीजचा शेअर 2.40 रुपयांवर होता. त्यात 4.35 टक्क्यांची उसळी दिसली. तर क्रिधन इन्फ्रा हा शेअर 2.6 रुपयांवर होता. त्यात 4 टक्क्यांची वाढ आली. इम्पेक्स फेरो टेक 3.45 रुपयांचा हा शेअर 4.55 टक्क्यांनी वधारला. फ्युचर रिटेल शेअरचा भाव 3.65 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यात 4.29 टक्क्यांची उसळी आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?