Mukesh Ambani : बुद्धीबळाचा हाच खेळाडू! 10 स्टॉकच्या जोरावर मुकेश अंबानी यांनी मारली बाजी

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे उद्योगपतीच नाही तर एक हुशार गुंतवणूकदार पण आहेत. या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरली आहे, त्यांना इतके टक्के परतावा मिळाला आहे.

Mukesh Ambani : बुद्धीबळाचा हाच खेळाडू! 10 स्टॉकच्या जोरावर मुकेश अंबानी यांनी मारली बाजी
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 3:44 PM

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. रिलायन्सचे (Reliance Industry) चेअरमन आहेत. रिलायन्सच्या पंखाखाली अनेक कंपन्या आगेकुच करत आहेत. त्यांनी समूहातील काही कंपन्यांची जबाबदारी मुलांवर सोपवली आहे. रिलायन्सने या वर्षांत विस्ताराचा जोरदार वेग पकडला आहे. अंबानी हे केवळ उद्योगपतीच नाही तर हुशार गुंतवणूकदार म्हणून पण ओळखल्या जातात. स्टॉकएज नुसार, मुकेश अंबानी यांच्याकडे 11 कंपन्यांचे शेअर आहेत. चालू आर्थिक वर्षात त्यातील एकाच शेअरबाबत त्यांचा अंदाज चुकला. हा शेअर सध्या डाऊन साईडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी यांची मुख्य कंपनी आहे. तर जिओ फायनेन्शिअल शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. चला तर जाणून घेऊयात अंबानी यांच्या कोणत्या शेअरने जोरदार कामगिरी केली ते…

या 10 शेअर्सने केली मोठी कमाल

  1. आलोक इंडस्ट्रीज (Alok Industries) : चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये आतापर्यंत या शेअरने 68 टक्के परतावा दिला आहे.
  2. नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेसमेंट (Network 18 Media & Investments) : या शेअरने या वर्षात आतापर्यंत मुकेश अंबानी यांना 58 टक्के परतावा दिला आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. डेन नेटवर्क्स (Den Networks) : या शेअरमध्ये या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून 57 टक्के उसळी घेतली आहे. अंबानी यांना या शेअरने 57 टक्के परतावा दिला आहे.
  5. हाथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम (Hathaway Bhawani Cabletel & Datacom) : या स्टॉकमध्ये यावर्षी आतापर्यंत 30 टक्के तेजी दिसून आली.
  6. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल (Sterling & Wilson Renewable) : या शेअरमध्ये अंबानी यांना या वर्षांत चांगला परतावा दिला. या शेअरमध्ये 26 टक्क्यांची उसळी दिसून आली.
  7. रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Industrial Infrastructure) : या स्टॉकमध्ये आतापर्यंत 24 टक्क्यांची तेजी दिसून आली.
  8. जस्ट डायल (Just Dial) : या शेअरमध्ये एप्रिलपासून ते आतापर्यंत 23 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.
  9. टीवी18 ब्रॉडकास्ट (TV18 Broadcast) : या शेअरमध्ये या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 21 टक्क्यांची उसळी दिसून आली.
  10. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) : या स्टॉकमध्ये आतापर्यंत 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
  11. हाथवे केबल अँड डेटाकॉम (Hathaway Cable & Datacom) : या स्टॉकमध्ये आतापर्यंत यावर्षात 36 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.