AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rate : देशाच्या प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
| Updated on: Jul 31, 2022 | 9:54 AM
Share

नवी दिल्ली : देशाच्या प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल(Petrol), डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालवधिपासून देशासह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर (Diesel Rate) स्थिर आहेत. एकीकडे आतंरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या मार्जीनमध्ये घट झाली आहे. गेल्या 21 मे रोजी पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे 22 मे पासून पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 तर डिझेलचा रेट हा प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा रेट प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा रेट प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये लिटर इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये मिळत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात इंधनाचे दर

दररोज सकाळी पेट्रोल, डिझेलचे दर हे पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात येतात. इंधनाचे दर हे कच्च्या तेलावर अवलंबून असतात. त्यामुळे जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तर पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि कच्च्या तेलाचे दर जर कमी झाले तर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. मात्र भारतात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर