AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Today Petrol Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 27, 2022 | 8:29 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्य तीन महिन्यांपासून देशासह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Rate) स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर साडेनऊ रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर सहा रुपयांची कपात झाली. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. देशात एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र दुसरीकडे इतर इंधन एलपीजी, सीएनजी, पीएनजी, जेट फ्यूल यांच्या दरात वाढ सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. मात्र देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा फटका कमी अधिक प्रमाणात पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे.

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.10 तर डिझेलचा दर प्रति 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमके प्रति लिटर 106.03 आणि 92.76 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये एवढा आहे. प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना केल्यास सर्वत स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये मिळत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात नवे दर

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधनाचे नवे दर जारी केले जातात. देशात गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...