AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate today : आज विचारही करू नका… सोन्याच्या दरात हजारोंनी उसळण, 10 ग्रॅमसाठी आज मोजावे लागणार..

Gold Silver Price Today 25 March 2026 : पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची अपेक्षा आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या दरात वाऱ्याच्या वेगाने उसळण झाली. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचं सोनं घ्यायचं स्वप्न भंगू शकतं. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Silver Rate today : आज विचारही करू नका... सोन्याच्या दरात हजारोंनी उसळण, 10 ग्रॅमसाठी आज मोजावे लागणार..
सोन्याची चमक पुन्हा परतली, आजचे दर काय ?
| Updated on: Mar 25, 2026 | 11:11 AM
Share

Gold and Silver Rate today : जागतिक बाजारात बुधवारी, 25 मार्च रोजी सोनं-चांदीच्या दरात जबरदस्त उसळण पहायला मिळाली. कमजोर डॉलर, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण संपण्याच्या आशेने सराफा बाजारात नवचैतन्य संचारले. आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.

MCX एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 5.5 टक्क्यांनी, म्हणजेच 12 हजारांहून अधिकने वाढून 2लाख 36 हजार रपेय प्रति किलोवर पोहोचला. तसंच काहीसं चित्र दुसरीकडेही होतं, तिथे सोन्याचा भाव जवळपास 4 टक्क्यांनी, म्हणजेच 5500 रुपयांहून अधिकने वाढून 1 लाख 44 हजार 400 रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला.

जागतिक बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्डच्या दरात 2 ते 2.5 टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति औंस सुमारे 4,568 डॉलरवर पोहोचलं. अमेरिकन सोन्याच्या वायद्यांमध्येही 3 ते 4 टक्क्यांची वाढ झाली. चांदीही फार मागे राहिली नाही, स्पॉट चांदीच्या दरात 3.5 ते 3.8 टक्क्यांची वाढ होऊन ती प्रति औंस 73 डॉलरच्या वर पोहोचली.

किरकोळ विक्रीत किंमत कुठपर्यंत ?

बुलियन वेबसाइटनुसार, सोन्याचा भाव 5510 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्यासाठी 1 लाख 44 हजार 950 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 12,010 रुपयांनी वाढून प्रति किलो 2, 36,750 रुपयांवर पोहोचला.

डॉलर आणि कच्च्या तेलाने दिला आधार

डॉलर कमकुवत झाल्यामुळे इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोनं आणि चांदी स्वस्त झालं असून, त्यामुळे मागणी वाढली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरल्याने महागाईबद्दलची चिंता कमी झाली आहे. इराणसोबत करार घडवून आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न हे याचं प्रमुख कारण मानलं जातंय.

युद्ध आणि महागाईच्या भीतीमुळे अलीकडे दबावाखाली असलेला सोन्या-चांदीबद्दल, आता गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत असल्याचं दिसत आहे. व्यापारी हळूहळू त्यांच्या सध्याच्या स्थितीमध्ये बदल करत असून, बाजारात नवीन खरेदी होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर मध्य-पूर्वेतील तणाव कमी झाला आणि डॉलर कमकुवत राहिला, तर सोने आणि चांदीच्या दरांमधील ही तेजी कायम राहू शकते.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक