
Petrol Diesel price : दिलासादायक बातमी समोर आलीये, ती म्हणजे आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या दरात (Petrol diesel rate today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले. नव्या दरानुसार आज देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. इंधनाचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार एक्साइज ड्यूटी (Excise duty on petrol) कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार एक्साइज ड्यूटी कपातीचा पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता एक्साइज ड्यूटीमध्ये कोणतीही कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या दरानुसार इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राज्यभरात पेट्रोल,. डिझेलचे भाव स्थिर आहेत. पाहुयात प्रमुख शहरातील इंधनाचे दर आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 20.51 रुपये लिटर आहे, तर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.11 रुपये तर डिझेल 102.82 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.30 आणि 104. 30 रुपये लिटर आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आज पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे.
सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाई देखील वाढली आहे. इंधनाचे दर कधी नियंत्रणात येणार असा प्रश्न केंद्रीय पेट्रोलिय मंत्र्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जर राज्यांनी इंधनावर आकारण्यात येणारा व्हॅट कमी केल्यास पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होतील. ते छत्तीसगड दौऱ्यावर असताना बोलत होते.
Petrol, diesel price: इंधनाचे भाव कसे कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितला उपाय
‘कोटक महिंद्रा बँके’ची ग्राहकांसाठी भेट, आता FD वर पूर्वीपेक्षा मिळेल जास्त नफा !