टोमॅटो झाले स्वस्त; गेल्या महिन्याभरात भावात 23 टक्क्यांची घसरण

| Updated on: Dec 23, 2021 | 6:15 AM

गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशाच्या काही भागांमध्ये तर टोमॅटो प्रति किलो शंभंर रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात होते. मात्र आता टोमॅटोचे दर कमी झाले आहेत.

टोमॅटो झाले स्वस्त; गेल्या महिन्याभरात भावात 23 टक्क्यांची घसरण
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशाच्या काही भागांमध्ये तर टोमॅटो प्रति किलो शंभंर रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात होते. मात्र आता टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. आवक वाढल्याने भावामध्ये घट झाली आहे. या आठवड्यामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली. कृषी विभागाच्या वतीने बुधवारी ही माहिती देण्यात आली.

महिन्याभरात टोमॅटोचे दर 23 टक्क्यांनी घटले

याबाबत कृषी विभागाकडून माहिती देताना सांगण्यात आले की, गेल्या 15 दिवसांमध्ये टोमॅटोचे दर हे 12.89 टक्के तर गेल्या महिन्याभरात 23 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 21 डिसेंबरला टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 47.52 रुपये इतकी होती. 14 डिसेंबरला 54.55 रुपये इतकी होती. तर 21 नोव्हेंबरला 62.27 रुपये प्रति किलो इतकी होती. याचाच अर्थ मागील एक महिन्यामध्ये टोमॅटोच्या दरात 23 टक्क्यांनी घट झाली आहे. एक महिन्यापूर्वी देशाती प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने शंभर पार केली होती. चेन्नईमध्ये तर एक किलो टोमॅटोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता टोमॅटोचे दर काही अंशी नियंत्रणात आल्याने सर्व सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

का वाढले दर ?

ऐन टोमॅटो काढणीच्या हंगामध्ये देशभरात अवकाळी पाऊस झाला होता.  अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे पीक खराब झाले होते. पीक खराब झाल्याने टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला. तसेच त्याचकाळात राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण पातळी प्रचंड प्रमाणात वाढली होती. धुक्यामुळे दृष्टमानता कमी झाल्याने माल वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत होते. भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ वेळेवर शहरात पोहोचत नव्हते. परिणामी टोमॅटोची आवक घटल्याने दरामध्ये वाढ झाली होती.

संबंधित बातम्या

देशात आर्थिक विषमता वाढली; केवळ 10 टक्के लोकांकडे 57 टक्के संपत्ती

सोने, चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव

पुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा