सोने, चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव

आज सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया काही अंशी मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने स्वस्त झाले.

सोने, चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 22, 2021 | 9:04 PM

नवी दिल्ली: आज सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये बुधवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 145 रुपयांची घट झाली असून, सोने 47,093 रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव देखील 397 रुपयांनी कमी झाले असून, चांदीचे दर प्रति किलो 60,498 रुपये इतके झाले आहेत. मंगळवारी चांदीचे दर हे 60,895 रुपये  प्रति किलो होते. तर सोन्याचा भाव 47,238 रुपये इतका होता.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत

बुधवारी डॉरच्या तुलनेत रुपया मजबूत  झाला आहे. रुपयांची किंमत 11 पैशांनी वाढून प्रति डॉलर 75.48 रुपयांवर पोहोचली आहे. रुपयांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने त्याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर देखील झाला. परिणामी  बुधवारी सोने काही प्रमाणात स्वस्त झाले. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने काही प्रमाणात सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरामध्ये चढ उतार होताना दिसत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्थरावर म्हणजेच 56 हजार रुपये प्रति ग्रॅमवर  पोहचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली. चालू वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात तर सोन्याचे दर 45 हजारापर्यंत खाली आले होते. म्हणजे त्यामध्ये तब्बल अकरा हजारांची घट झाली होती. मात्र त्यानंतर गेल्या दोन महिन्यात सोन्याचे भाव काही अंशी वधारले असून, 48 हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या 

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मसाल्यांना मोठी मागणी; सात वर्षांमध्ये निर्यात साठ टक्क्यांनी वाढली

पुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा

शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 611 अंकाच्या वाढीसह बंद; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें