AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani FPI : शेअरची भरारी, परदेशी पाहुण्यांनी आखडला हात, अदानी समूह पुन्हा संकटात?

Gautam Adani FPI : हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूह सावरत आहे. तरी अदानी समूहाकडून योग्य स्पष्टीकरण येत नसल्याने अनेक परदेशी गुंतवणूकदार आणि कंपन्या अंग काढत आहेत. त्यामुळे अदानी समूहाला नवीन संकटाची चाहूल लागली आहे.

Gautam Adani FPI : शेअरची भरारी, परदेशी पाहुण्यांनी आखडला हात, अदानी समूह पुन्हा संकटात?
पुन्हा संकट
| Updated on: Feb 09, 2023 | 8:22 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मागील शुल्ककाष्ट काही कमी होताना दिसत नाही. संकटांची एक एक मालिका सुरुच आहे. गेल्या पंधरवाड्यात अदानी समूहाला (Adani Group) मोठा झटका बसला आहे. अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी समूहात भूकंप आला. त्यांचे अनेक शेअर गडगडले. गौतम अदानी यांची संपत्ती झरझर कमी झाली. दोन दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअरने चांगली कामगिरी बजावली. शेअर (Share) पुन्हा तेजीत आले. पण आता परदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेमुळे अदानी समूहासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. फ्रांसच्या एका मोठ्या कंपनीने अदानी समूहासोबतची 50 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला आहे.

अदानी समूहाला फ्रांसच्या टोटल एनर्जीज या कंपनीने मोठा झटका दिला आहे. अदानी समूहात या विदेशी गुंतवणूकदाराने मोठ्या गुंतवणुकीची तयारी केली होती. हायड्रोजन प्रोजेक्टसाठी अदानी समूहासोबत 50 अब्ज डॉलरचा प्रस्ताव कंपनीने राखीव ठेवला आहे.

बिझनेस स्टँडर्डने रायटर्सच्या आधारे याविषयीचे वृत्त दिल आहे. त्यानुसार हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाचा लेखा परिक्षण अहवाल येईपर्यंत हा करार पुढे सरकणार नाही. या आरोपींची शहानिशा झाल्याशिवाय कंपनी अदानी समूहाशी पुढील बोलणी करणार नाही.

गेल्या वर्षी 2022 मधील जून महिन्यात दोन्ही समूहांनी घोषणा केली होती. त्यानुसार, फ्रांसची टोटल एनर्जीज ही कंपनी अदानी समूहात गुंतवणूक करणार होती. अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ही कंपनी 25 टक्के इक्विटी हिस्सेदार होणार होती. ग्रीन हायड्रोजन विकसीत करण्यासाठी कंपनी अनेक प्रकल्पात सहभागी होत आहे. 2030 पर्यंत कंपनीने 50 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.

टोटल एनर्जीचे सीईओ पॅट्रिक पॉयाने (Patrick Pouyanne) यांनी याप्रकरणी बाजू मांडली. त्यानुसार हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टवर अदानी समूहाकडून योग्य स्पष्टीकरण आलेले नाही. कंपनीचा लेखाजोखा समोर मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे हायड्रोजन प्रकल्पावर पुढील चर्चा थांबविण्यात आली आहे. यामुळे अदानी समूहाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

गेल्या वर्षी 2022 मध्ये जगात सर्वात वेगाने त्यांची संपत्ती वाढत होती. त्यांची झपाट्याने प्रगती झाली. त्यांनी श्रीमंतांच्या यादीत दुसरे स्थान पटकावून सर्वांनाच धक्का दिला. जगातील श्रीमंतांच्या भुवया वर झाल्या होत्या. पण या अहवालाने त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. हिंडनबर्गचा अहवाला आल्यानंतर 10 दिवसांत त्यांनी 52 अब्ज डॉलर गमावले. अदानी समूहातील एकूण सर्व कंपन्यांचे भांडवल 100 अब्ज डॉलरने घसरले होते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.