…हा तर आमच्या खिशावर टाकलेला दरोडा; कोरोनाच्या नव्या नियमांवर व्यापाऱ्यांचा संताप

| Updated on: Nov 29, 2021 | 2:44 PM

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कठोर नियम घालते आहेत. मात्र हे नियम व्यापाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

...हा तर आमच्या खिशावर टाकलेला दरोडा; कोरोनाच्या नव्या नियमांवर व्यापाऱ्यांचा संताप
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणुचा चिंताजनक प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच देश सतर्क झाले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान भारताने देखील कोरोनाच्या नियमांबाबत नवी गाईडलाईन्स तयार केली आहे. महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कठोर नियम घालते आहेत. मात्र हे नियम व्यापाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘असे’ आहेत नवे नियम 

राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार जर एखादा व्यक्ती विनामास्क बाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मात्र तोच व्यक्ती एखाद्या दुकानात विनामास्क खरेदी करताना आढळल्यास संबंधित दुकानदाराकडून दहा हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात येणार आहे. तर मॉलमध्ये एखाद्या व्यक्ती विनामास्क आढळला तर संबंधित मालकाला पन्नास हजारांचा दंड करण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करावी

दरम्यान राज्य सरकारच्या या नियमांचा दुकानदार आणि व्यवसायिकांकडून विरोध करण्यात येत आहे. दुकानदारांनी कोरोनाच्या नवीन नियमांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. दहा हजारांचा दंड हा अतिशय जास्त होतो. नागरिकांनी मास्क घालावे यासाठी सरकारने जगजागृती करावी, मास्क न घातल्यास एका विशिष्ट रकमेपर्यंत दंड देखील आकारण्यात यावा. परंतु ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांकडून दहा ते पन्नास हजारांचा दंड वसूल करण्याचा नियम करण्यात याला आहे. ते पाहाता हा आमच्या खिशावर दरोडा टाकण्याचा नियोजित प्लॅन वाटत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधिच मागच्या दोन लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये हा अव्वाच्या सव्वा दंड भरायचा कसा? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या 

संकटातले संधीसाधू! सरकारनं कोरोना काळात फक्त खजाने भरले, महाविकास आघाडीवर विरोध पक्ष नेते फडणवीसांचा आरोप

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

VIDEO: हिवाळी अधिवेशन फक्त 5 दिवसांचं, मार्चमध्ये नागपुरला विशेष अधिवेशन?