
भारताच्या संरक्षण क्षेत्राने ‘मेक इन इंडिया’ मोहीमेंतर्गत शस्रास्र निर्मितीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यूएईतील CARACAL ( EDGE ग्रुपची घटक कंपनी) आणि भारतीय ICOMM ( MEIL ग्रुपची सहाय्यक कंपनी ) यांनी हैदराबाद येथे अत्याधुनिक लघु शस्रास्र उत्पादन कारखाना सुरू केला आहे. यूएईमधून तंत्रज्ञान हस्तांतरणाने भारतात सुरु होणारा हा पहिलाच संरक्षण शस्रास्रांचा प्रकल्प आहे.
CARACAL च्या या अत्याधुनिक शस्रास्र निर्मिती केंद्रात शस्रास्रांचे उत्पादन होणार आहे, यात रायफल्स, स्नायपर रायफल्स, सबमशीन गन्स आणि कॉम्बॅट पिस्तुल यांचा समावेश आहे.या अत्याधुनिक शस्रास्रांचा समावेश आहे.
प्रमुख शस्त्रे:
• CAR 816 क्लोज-क्वार्टर बॅटल रायफल
• CSR 338 स्नायपर रायफल
• CMP9 सबमशीन गन
या शस्रांची गरज आणि उपयोग : या शस्रास्रांचा उपयोग भारतीय सैन्य, अर्धसैनिक दल, विशेष दल, राज्य पोलिस दल, तसेच जागतिक निर्यातीच्या गरजा पुरवण्यासाठी केला जाणार आहे
हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून, हे उत्पादन केंद्र भारताला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणखी पुढे नेईल असे ICOMM चे व्यवस्थापकीय संचालक सुमंत पटुरू यांनी म्हटले आहे. “युएई बरोबरील ही भागीदारी भारताच्या संरक्षण उद्योगाच्या वाढीस गती देण्यात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे..” असे CARACALचे CEO हमाद अलमेरी यांनी म्हटले आहे.
• भारतीय कौशल्य आणि युनाएटेड अरब अमिरातीचे तंत्रज्ञान यांचे एकत्रीकरण : भारताच्या जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला चालना
• आत्मनिर्भर भारतासाठी अत्यावश्यक पाउल : स्थानिक उत्पादनाची वाढ आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन.
• निर्यात क्षमता : भारत आता जागतिक पातळीवर उच्च दर्जाची शस्त्रे पुरवठा करू शकणार आहे.