
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. इतिहासात पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला गेला. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या होत्या. शेतकऱ्यांबद्दल काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या.पीएम किसान, प्रधानमंत्री विमा योजना याकरिता निधी वाढला. गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड वाढली असून त्यासंदर्भात देखील काही घोषणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे निर्मला सीतारामण यांनी तब्बल नव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला. नक्की काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे देशाच्या नजरा होत्या. निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर देशाचे शेअर मार्केट कोसळल्याचे बघायला मिळतंय.
आंबेपूर मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता जनसमर्थन पाहून विरोधक घाबरल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे. तसेच आंबेपूर, पेझारी आणि पोयनाड परिसरात शिवसेनेचे प्रचार बॅनर फाडण्यात आल्याचे प्रकार समोर आले असून, हे कृत्य भाजपविरोधी कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा खळबळजनक दावा राजा केणी यांनी केला आहे.
मुंबईतील मनपा शाळेतील महिला शिक्षकांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. महिला शिक्षकांसाठी ‘बालपण जादूचे’ या विरंगुळ्याच्या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. ‘सन्मान महिलांचा… आदर नारीशक्तीचा’ या घोषवाक्याखाली महिला शिक्षकांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करण्यात आला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिक्षक नेते डॉ. विशाल कडणे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत, थोड्याच दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले आहे. भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे. कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही, कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे, असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.
मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सांगलीच्या वाळवा येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी सांगलीची माणसं फक्त चांगली नाहीत तर देव माणस आहेत असंही विधान केले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी एकत्रित होण्याच्या चर्चा सुरू असतानाच अदानी शरद पवारांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या पदरी पडलेली वाटाण्याची अक्षदा असून शेतकरी, युवक, मध्यमवर्ग आणि सामान्य नागरिकांची घोर निराशा करणारा आहे, अशी टीका उबाठा नेते आणि माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून केली.
जळगाव महापालिकेत महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार तसेच फार्म्युला ठरविण्यासाठी महायुतीची बंददाराआड बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील ,आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि भाजप आ.सुरेश भोळे ,आ. मंगेश चव्हाण यांची उपस्थिती आहे.
भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून अब्दुल मणियार हा आरोपी आज सकाळी १० च्या सुमारास फरार झाला आहे. या आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्राय भरणे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयल केंद्रस्थानी असून, त्यामळे अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर भरणे यांनी दिली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये शेतकरी, महाराष्ट्र तसेच देशातील उद्योग आणि उद्योजकांना काहीच मिळाले नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ज्या गोष्टींचे या अधी नियोजन केले होते, त्याबाबत काय झालं? त्याचं सांगितलं असतं तर बरं झालं असतं, त्याचबरोबर मंदिरांसाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, मात्र कोणत्या मंदिरांसाठी हे सांगितलं नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्याचे सांगितले. या निर्णयांमुळे इंडिया स्टॅक आणि बौद्धिक संपदा (IP) संबंधित बाबी अधिक सक्षम होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग योजना जाहीर करण्यात आली आहे.
देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाने पाऊल उचललेलं आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. भविष्यात संशोधनाला महत्त्व दिले जाणार आहे, 24 हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. वैज्ञानिकांना संशोधन करण्यासाठी प्रोहत्साहन मिळालं पाहिजे, अशा शब्दात पंकज भोयर यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
युवा आणि खेळाडूंसाठीही अर्थसंकल्पात आनंदाची बातमी आहे. वित्तमंत्र्यांनी सांगितले की, खेळाच्या साहित्याला अधिक किफायतशीर बनवण्यावर सरकारचा भर राहील. याचा थेट परिणाम क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनसारख्या खेळांच्या सामानावर दिसेल आणि जास्त युवक खेळाकडे आकर्षित होतील.
केंद्र सरकारच्या नव्या बजेटमध्ये शेती आणि आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी AI आधारित ‘मल्टीलिंगुअल टूल’ सुरू करण्यात आले असून, यामुळे हवामानाचा अंदाज, पिकांची स्थिती आणि योग्य सल्ला अचूकपणे मिळणार आहे. त्यामुळे शेती अधिक स्मार्ट आणि उत्पादक होण्यास मदत होईल. आरोग्य क्षेत्रात दिलासादायक निर्णय घेत कर्करोगावरील 17 अत्यावश्यक औषधे आणि 7 दुर्मीळ आजारांवरील औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. यामुळे ही औषधे रुग्णांसाठी अधिक परवडणारी ठरणार आहेत. तसेच पशुपालन क्षेत्रासाठी नवीन व्हेटरनरी कॉलेज सुरू करण्यासाठी विशेष कर्ज योजना जाहीर करण्यात आली असून, यामुळे पशुवैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण रोजगाराला चालना मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला अर्थसंकल्प.
हर्षवर्धन सपकाळ यांची अर्थसंकल्पावर टीका.
बेरोजगारांना, मध्यम वर्गियांना, शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही
सर्वांच्या हातावर तुरी देण्याचे काम केंद्रीय अर्थ संकल्पाचा माध्यमातून झालं
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका
कऱ्हेवडगावचे सरपंच परिवंत गायकवाड यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच आष्टी मतदार संघात शेकडो बॅनर आमदार सुरेश धस यांचे शुभेच्छा देण्यासाठी मोठ मोठाले फ्लेक्स लावण्यात आले होते. तसेच समाजउपयोगी विविध सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ते ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याने आमदार सुरेश धस यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी लावलेले बॅनर देखील हटवण्यात आले आहेत.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. यातुन आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार झाला आहे. आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे असा आरोप शिंदे शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत. या प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदेसेनाच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली, यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला, यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप मोटे समर्थकांनी केला आहे.
लोकल टू ग्लोबल होण्याकरिता गती मिळणार असल्याचे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा आमचा संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
नुकताच अर्थसंकल्पाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विकसत भारताकडे पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे.
सर्वसामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पात कोणत्याही पद्धतीचा दिलासा देण्यात आला नाहीये. इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. बऱ्याच लोकांना वाटले की, या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबद्दल मोठी घोषणा केली जाईल. मात्र, तशी काहीच झाले नाही. इन्कम टॅक्स आहे तसाच राहणार आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यात आला. यानंतर शेअर बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे.
आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण मांडत आहेत, यादरम्यान शेअर बाजार कोसळल्याचे बघायला मिळत आहे. 1150 ने सेन्सेक्स खाली गेला.
नारळ उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केली जाणार असून त्याबाबत मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
सोलार संबंधित वस्तू स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून 2026 चा अर्थसंकल्प मांडला जात आहे. दारू आणि भंगार महाग होणार आहे.
अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटीपर्यंत करण्यात आली आहे. तशी माहिती निर्मला सीतारामण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
भारतात डेटा सेंटर सुरू करणाऱ्यांना मोठी सूट दिली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.
उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी 10 हजार कोटींचा फंड मिळणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
छोट्या करचोरी प्रकरणात आता कोणतीही शिक्षा होणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना निर्मला सीतारामण दिसल्या आहेत.
उत्पादन लपवल्यास अतिरिक्त 30 टक्के टॅक्स लागेल, असे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी घोषित केले आहे.
10 वर्षात 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर येतील, असे निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.
अपघात विम्याच्या मिळणाऱ्या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नसणार असल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
नवीन टॅक्सची प्रणाली 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल, अशी मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
मंदिरासाठी 5 हजार कोटींचा निधी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी अत्यंत मोठी घोषणा केली असून महिलांसाठी खास मार्टची उभारणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी AI टूल तयार करणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
पशुपालन उद्योगासाठी अनुदान देणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यावर अधिक भर दिला जाईल.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारले जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुवैदिक केंद्र उभारणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.
अर्थसंकल्प 2026 अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडला. यावेळी त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे स्वस्त करण्यात आली आहेत.
पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करण्याबाबत मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे. पर्यटन वाढवण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे.
वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्र उभे करणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे. यामुळे विकासाला मदत होणार आहेत.
सेमी कंटक्टरसाठी तब्बल 40 हजार कोटींची निधी घोषित करण्यात आला आहे. निर्मला सीतारामण या भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
खनिज कॉरिडोअर आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळला होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले असून भविष्यात याबाबत निर्णय घेतली जातील.
गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत, असे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केली आहे. आर्थिक विकासदरात वाढ हे आमचे पहिले मोठे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.
देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर आमचा भर असल्याचे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केले आहे.
अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. या अर्थसंकल्पाकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.
नुकताच अर्थसंकल्पाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विकसीत भारताचा अर्थसंकल्प असणार आहे.
डाळी, तेल, तांदूळ, भाज्या, औषधे आणि वीज आणि पाणी यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केले जाऊ शकतात. यामुळे घरगुती खर्चात कमी होण्याची शक्यता आहे.
संसदेत मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली आहे. काही वेळात निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 च्या आधी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोने आणि चांदीच्या किंमती कमी सर्किटवर पोहोचल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी बैठकीला सुरूवात झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसद भवनात पोहोचल्या आहेत. अर्थसंकल्पाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घेतल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसद भवनात पोहोचल्या आहेत, जिथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
2026 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत 11 वाजता सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून लाडक्या बहिणींसाठी काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असून त्यांनी अर्थसंकल्पाची एक प्रत राष्ट्रपतींकडे सुपूर्द केली आहे.
राष्ट्रपती भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण दाखल झाल्या आहेत. निर्मला सीतारामण आणि राष्ट्रपती यांच्यात चर्चा सुरू आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनातून निर्मला सीतारामण संसदेकडे रवाना होतील.
पंतप्रधान किसान योजना: शेतकऱ्यांना देण्यात येणारी वार्षिक 6,000 रुपयांची मदत 9,000 किंवा 12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ही मोठी घोषणा होऊ शकते.
2026 च्या अर्थसंकल्पात रोजगारावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 11 वाजता निर्मला सीतारामण देशाचा अर्थसंकल्प मांडतील.
देशात गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात मोठी वाढ होत आहे. दीड लाखाच्या पुढे सोने गेले. यामुळे 2026 च्या अर्थसंकल्पात सोने कमी होण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका आहेत. यादरम्यान अर्थसंकल्पात या दोन राज्यांबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते.
आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून मोठ्या घोषणा केल्या जातील. सोन्याबाबत काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज 11 वाजता संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यादरम्यान गृहकर्जदारांना व्याजदरातून दिलासा मिळण्याचे मोठे संकेत आहेत.
यंदाच्या 2026 च्या अर्थसंकल्पात जुनी आयकर प्रणाली रद्द होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण घोषणा करू शकतात.
जॉइंट इन्कम टॅक्स रिटर्न फाइल संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण याबाबतची घोषणा करू शकतात. आज निर्मला सीतारामण या 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जातील.
आज देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून या अर्थसंकल्पात महागाई हा एक अत्यंत मोठा मुद्दा असणार आहे. महागाई कमी करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्याची शक्यता आहे.
जुन्या कर प्रणालीमध्ये गृहकर्ज, विमा प्रीमियम सवलत आणि पीपीएफ सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक यासारखे कर लाभ उपलब्ध आहेत. मात्र, या नव्या अर्थसंकल्पात याबद्दल काही बदल होऊ शकतात.
2025 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. या अर्थसंकल्पात नक्की काय घोषणा होतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प हा मांडला जात आहे. काय स्वस्त होणार याकडे देशाच्या नजरा आहेत.