Insurance : विमा कंपन्यांच्या मार्केटिंग कॉलने झालाय हैराण, अशी वापरा युक्ती, या स्टेप करा फॉलो, लगेच होईल त्रासातून सूटका

Insurance : विमा कंपन्यांच्या मार्केटिंग कॉलमुळे त्रस्त झाला आहात, तर ही गोष्ट नक्की करा..

Insurance : विमा कंपन्यांच्या मार्केटिंग कॉलने झालाय हैराण, अशी वापरा युक्ती, या स्टेप करा फॉलो, लगेच होईल त्रासातून सूटका
या त्रासातून होईल मुक्तताImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 11:18 PM

नवी दिल्ली : देशात अनेक विमा (Insurance) कंपन्या आणि कर्ज (Loan) देणाऱ्या काम करत आहेत. पूर्वी या कंपन्या एजंटमार्फत काम करत होत्या. पण आता डिजिटल युगात या कंपन्यांनी मार्केटिंग फंडे अवलंबिले आहेत. तुम्हाला सकाळ-संध्याकाळ, कोणत्याही वेळी या कंपन्या पॉलिसी खरेदीसाठी कॉल (Policy Calls) करतात. जर तुम्ही असे कॉल, अथवा SMS ने त्रस्त झाला असाल तर ही बातमी तुमच्या कामाचीच आहे. तुम्हाला नकोसे असलेले कॉल आणि एसएमएस पासून सूटका करुन घ्यायची असेल तर ही सोपी पद्धत आहे.

विमा कंपनी आणि कर्ज देणाऱ्या कंपन्या तुम्हाला ई-मेल, एसएमएस पाठवून आणि कॉल करुन त्यांचे नवनवीन योजना, ऑफर याची माहिती देतात. Policy Bazaar ही एक कंपनी आहे. जर तुम्ही या नकोशा कॉलमुळे त्रस्त असाल, ही कंपनी तुमच्या मदतीला धावून येईल.

Policy Bazaar ही कंपनी ग्राहकांना या त्रासापासून वाचविण्यासाठी मदत करते. या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या त्रासापासून सूटका करुन घेऊ शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला चांगली माहिती दिली आहे. या माहितीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

2008 साली देशात Policy Bazaar ही कंपनी सुरु झाली होती. ही विमा अधिकृत कंपनी आहे. विमा आणि याविषयीच्या उत्पादनाची माहिती या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळते. ही कंपनी अनेक विमा पॉलिसींची तुलना करते. त्याआधारे ग्राहकांना योग्य पॉलिसीची निवड करण्यास मदत करते.

जर तुम्ही Policy Bazaar या संकेतस्थळावर अगोदरच नोंदणी केली असेल तर नको असलेले कॉल तुम्हाला बंद करता येतात. संकेतस्थळावर नोंदणी केल्यावरही तुम्हाला एसएमएस आणि कॉलपासून सूटका करता येते.

त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला Policy Bazaar या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करावे लागले. त्यानंतर प्रोफाईलमध्ये जाऊन सेटिंग पर्यायावर जावे लागेल. Setting वर क्लिक केल्यावर Communication Preferences हे पेज उघडेल.

या ठिकाणी तुम्हाला SMS, Call आणि WhatsApp चा पर्याय समोर येईल. या पर्यायपैकी तुम्हाला ज्या माध्यमातून विमा कंपनीची सेवा प्राप्त करायची असेल ती निवडता येते. विशेष म्हणजे तुम्हाला एकही पर्याय नको असेल तर तसाही पर्याय निवडता येतो. तुम्ही Unsubscribe From All हा पर्याय निवडू शकता.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.