EPFO वर बँक डिटेल्स कसे अपडेट कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

EPFO | EPFO ​​ने आपल्या सर्व सदस्यांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची सुविधा दिली आहे. ज्या सदस्यांकडे UAN क्रमांक आहे ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकतात. असेही काही लोक असू शकतात ज्यांनी यापूर्वी EPFO ​​चा फायदा घेतला आहे आणि त्यांचा UAN नंबर देखील आहे. पण तो नंबर रिकव्हर करू शकला नाही तर ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकत नाहीत.

EPFO वर बँक डिटेल्स कसे अपडेट कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पीएफ
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 10:34 AM

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी (EPFO) बँकेचे योग्य तपशील अत्यंत महत्त्वाचे असतात. तुम्ही वेळोवेळी बँक तपशील अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. EPFO सदस्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा UAN मिळतो जो कधीही बदलत नाही. नोकरी आणि कंपनी बदलली तरी हा क्रमांक बदलत नाही तर एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत बदली होते. हा क्रमांक संपूर्ण कामात कर्मचाऱ्याशी संबंधित असतो. आता या नंबरद्वारे तुम्ही EPFO ​​मध्ये बँक तपशील देखील अपडेट करू शकता.

EPFO ​​ने आपल्या सर्व सदस्यांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची सुविधा दिली आहे. ज्या सदस्यांकडे UAN क्रमांक आहे ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकतात. असेही काही लोक असू शकतात ज्यांनी यापूर्वी EPFO ​​चा फायदा घेतला आहे आणि त्यांचा UAN नंबर देखील आहे. पण तो नंबर रिकव्हर करू शकला नाही तर ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकत नाहीत.

UAN क्रमांकाचा फायदा

UAN क्रमांकाचे अनेक फायदे आहेत. ईपीएफओ सदस्य या युनिक नंबरद्वारे पेन्शन फंडाचे तपशील एकाच ठिकाणी पाहू शकतात. पीएफ खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती मिळवू शकतात. ईपीएफओमध्ये दिलेले बँक तपशील देखील अपडेट करू शकतात. याचा अर्थ असा की EPFO ​​सदस्य सहजपणे बँकेचे तपशील बदलू शकतात आणि हे काम घरी बसून ऑनलाइन केले जाईल.

पीएफ खात्यासाठी बँक डिटेल्स ऑनलाईन अपडेट कसे कराल?

* EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचा तपशील टाकून लॉग इन करा * वरच्या मेनूवरील ‘व्यवस्थापित करा’ टॅबवर क्लिक करा * ड्रॉप डाउन मेनूमधून ‘KYC’ पर्यायावर जा आणि दस्तऐवज प्रकारात ‘बँक’ निवडा * बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडसह नवीन बँक तपशील प्रविष्ट करा * अपडेटेड बँक तपशील प्रविष्ट करण्यासाठी ‘सेव्ह’ वर क्लिक करा. नंतर तपशील KYC प्रलंबित मंजूरी विभागांतर्गत दिसून येतील * आवश्यक कागदपत्रे तुमच्या नियोक्त्याकडे सबमिट करा (ज्या कंपनीसाठी तुम्ही काम करता). लक्षात ठेवा, SBI ग्राहकांसाठी, बँक फक्त डिजिटल माध्यमातून पडताळणी करेल. * केवायसी पडताळणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या विनंतीची स्थिती डिजिटली स्वीकारलेल्या केवायसीमध्ये अपडेट केली जाईल * नियोक्ता किंवा SBI द्वारे बँक तपशीलांची पुष्टी झाल्यानंतर EPFO ​​एक कन्फर्मेशन मेसेज पाठवला जाईल.

संबंधित बातम्या:

सौरउर्जेच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप; अवघ्या सात वर्षांमध्ये क्षमतेत 17 पट विस्तार

पीएफ खातेधारकांची पेन्शन वाढण्याची शक्यता, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विम्याच्या जगात जागतिक स्तरावर जाण्याच्या तयारीत ओला; यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून सुरू करणार विस्तार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.