AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ खास फिचर्सच्या मदतीने इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवायही UPI पेमेंट करू शकता. UPI फीचरद्वारे तुम्ही फक्त एक कोड डायल करून सहजपणे पैसे पाठवू शकता. हे फीचर 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते, परंतु बऱ्याच लोकांना अजूनही याबद्दल माहिती नाही. चला या फीचरबद्दल अधिक जाणून घेऊयात...

'या' खास फिचर्सच्या मदतीने इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
UPI Payment
| Edited By: | Updated on: Mar 25, 2026 | 8:19 AM
Share

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन पेमेंट आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. कारण आजकाल बाहेर पडल्यावर काही वस्तू खरेदी केल्यावर पैसे न देता ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करतो. परंतु जेव्हा मोबाईलमध्ये नेटवर्क नसते तेव्हा ही सोपी सोय एक समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत UPI नावाचे एक फिचर्स आहे जे इंटरनेटशिवायही पेमेंट करण्याची सुविधा देते. हे वैशिष्ट्य विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्याठिकाणी खूप कमी नेटवर्क असलेल्या भागात राहतात किंवा ज्यांना वारंवार कनेक्टिव्हिटीच्या समस्या येतात. चला तर मग आजच्या लेखात आपण इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करू शकता, ते जाणून घेऊयात.

आज डिजिटल पेमेंट इतक्या वेगाने वाढले आहे की लोकं रोख रक्कम सोबत बाळगायला जवळजवळ विसरले आहेत. भाजीपाला खरेदी करण्यापासून ते चहाचे पैसे देण्यापर्यंत किंवा मित्रांसोबत बिल शेअर करण्यापर्यंत फोनपे किंवा गुगलपेच्या साहाय्याने क्यूआर कोड स्कॅन करणे सामान्य झाले आहे. पण ज्या क्षणी इंटरनेट बंद होते, त्या क्षणी पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया थांबते. अशावेळेस इंटरनेटशिवाय वापरता येणारे यूपीआय फीचर उपयोगी पडते. हे विशेषतः अशा परिस्थितींसाठी तयार केले आहे, जेव्हा डेटा किंवा वाय-फाय उपलब्ध नसते किंवा नेटवर्क खूप कमी असते.

हे फिचर्स कसे काम करते

या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते इंटरनेटवरून नव्हे, तर USSD तंत्रज्ञानाद्वारे काम करते. याचा अर्थ असा की, जर तुमच्या फोनला नेटवर्क सिग्नल असेल आणि त्यावर कॉल करता येत असतील, तर पेमेंटदेखील करता येते. वापरकर्त्यांना फक्त त्यांच्या फोनवरून *99# डायल करायचे आहे. स्क्रीनवर एक मेन्यू उघडतो, जिथे तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता. ही पद्धत थोडी जुनाट वाटू शकते, पण ती अत्यंत विश्वासार्ह आहे.

इंटरनेटशिवाय अशा प्रकारे पेमेंट करा

इंटरनेट नसल्यास, तुम्हाला तुमच्या फोनवरून *99# डायल करावे लागेल. *99# डायल केल्यानंतर वापरकर्त्याला पैसे पाठवण्याचा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर मोबाईल नंबर, UPI आयडी किंवा बँक तपशिलाद्वारे पैसे पाठवता येतात.

मोबाईल नंबर टाकताच प्राप्तकर्त्याचे नाव स्क्रीनवर दिसते, ज्यामुळे त्रुटीची शक्यता कमी होते.

यानंतर तुम्हाला रक्कम आणि UPI पिन टाकावा लागेल आणि पेमेंट लगेच पूर्ण होईल.

संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि त्यासाठी इंटरनेटची अजिबात गरज भासत नाही.

हे फिचर्स वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

जरी हे फिचर्स अत्यंत उपयुक्त असले तरी, त्यासाठी काही पूर्वअटी आहेत. सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये आधार लिंक करणे देखील आवश्यक असू शकते. जर या मूलभूत आवश्यकता पूर्ण झाल्या नाहीत तर ही सेवा काम करणार नाही. त्यामुळे तुमच्या बँकेचा तपशील अद्ययावत ठेवणे उत्तम आहे, जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे पेमेंट करू शकाल.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?