AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI च्या माध्यमातून मित्रांकडून पैसे मागणे होणार बंद, 1 ऑक्टोबरपासून लागू होतील हे नवीन नियम

New Rules From October 1 : या 1 ऑक्टोबरपासून देशात अनेक मोठे बदल होत आहेत. रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते थेट युपीआयपर्यंत हे बदल दिसतील. त्याचा थेट नागरिकांच्या दैनंदिन कार्यावर परिणाम होईल. काय काय बदल होणार?

UPI च्या माध्यमातून मित्रांकडून पैसे मागणे होणार बंद, 1 ऑक्टोबरपासून लागू होतील हे नवीन नियम
| Updated on: Sep 26, 2025 | 4:56 PM
Share

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बँकिंग, रेल्वे, टपाल कार्यालय, क्रेडिट कार्ड, गॅस सिलेंडरच्या किंमतीसंदर्भात काही ना काही बदल होतो. 1 ऑक्टोबर 2025 पासून देशभरातही मोठे बदल लागू होत आहे. रेल्वे तिकीट बुकिंग आणि आरक्षणापासून त्याची झलक पाहायला मिळेल. तर राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीसंबंधी (NPS) नियमात बदल होत आहे. तर युपीआयवर 100 रुपये पाठव, 200 रुपये पाठव अशी रिक्वेस्ट पाठवणाऱ्या मित्रांपासून आता सुटका होणार आहे. तर 1 ऑक्टोबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतो की नाही याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. सणासुदीत किंमती कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे. काय काय आहेत हे बदल जाणून घ्या.

रेल्वे आरक्षण आणि तिकीट बुकिंग

रेल्वेने पहिल्यांदा ट्रेनमध्ये तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला होता. त्यातंर्गत तात्काळ तिकीट बुकिंग करताना आधार व्हेरिफिकेशन, पडताळा आवश्यक होता. आता आता जनरल आरक्षणासाठी सुद्धा ई आधार व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. तिकीट बुकिंग करताना सुरुवातीला 15 मिनिटांचा कालावधी ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी असेल.

ऑनलाईन गेमिंग कायदा 2025

ऑनलाईन गेमिंग कायदा 2025 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. हा कायदा आणण्यापूर्वी सरकारने गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर लोकांनी चर्चेच्या फेऱ्या केल्या आहेत. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 मुळे रिअल मनी गेमिंगवर पूर्णपणे बंदी येणार आहे. तर पैशांआधारीत ऑफर्स, त्याचा प्रचार, प्रसारास बंदी आहे. ऑनलाईन गेम खेळल्यास कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. पण रिअल मनी गेमचे प्रमोशन ऑफर्स देणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

युपीआयवरील उधारी खाते बंद

1 ऑक्टोबर 2025 पासून UPI युझर्ससाठी महत्त्वाचा बदल होत आहे. आता PhonePe, Paytm वा दुसऱ्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरून मित्र, नातेवाईकांकडे पैशांची रिक्वेस्ट पाठवता येणार नाही. UPI चे कलेक्ट रिक्वेस्ट, पूल ट्रान्झॅक्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. कारण अनेक जण पेमेंट रिक्वेस्ट पाठवून समोरच्याला हैराण करत होते.

पेन्शन फंडमध्ये बदल

राष्ट्रीय निवृत्ती निधी नियंत्रक प्राधिकरणाने (PFRDA) राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीत (NPS) मोठा बदलास होकार भरला आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. त्याला मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क असे नाव देण्यात आले आहे. त्यातंर्गत सरकारी कर्मचारी नसलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, गिग वर्कर्स यांना पॅन कार्ड क्रमांकावरून अनेक योजनेत थेट गुंतवणूक करता येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...