गरीबांचं सोनं करणार कमाल! पिवळ्याधमक सोन्यापेक्षा देणार अधिक परतावा, कोणी केला दावा?
Silver better return than gold : सोने आणि चांदीत स्पर्धा वाढली आहे. सोने या वर्षात मागून येत तिखट झाले आहे. चांदी प्रमाणेच सोने लाखात खेळत आहे. सोने आता सर्वसामान्यांच्या हातून निसटले आहे. पण चांदी लंबी रेस का घोडा आहे, काय म्हणतात तज्ज्ञ?

केडिया ॲडव्हायझरीचे अजय केडिया यांनी सोन्यापासून सावध राहण्याचा सल्ला ग्राहकांना, गुंतवणूकदारांना दिला. सोन्याने एकदम जबरदस्त रिटर्न दिला आहे. सोने अजून ही सुरक्षीत गुंतवणुकीसाठी अनेकांची पहिली आवड आहे. एका वर्षात सोन्याने 50 टक्क्यांचा परतावा (Gold Return) दिल्यानंतर आता थोडं सावध असणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, एप्रिल महिन्यात सोन्याचा भाव 10 टक्क्यांनी घसरला. ज्यावेळी सोन्यात पुन्हा इतकी घसरण होईल. तेव्हाच सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल असे मत त्यांनी मांडले. तर चांदीवर त्यांनी अधिक विश्वास दाखवला आहे. चांदीला गरीबांचं सोनं म्हटलं जातं. चांदीचा (Silver Return) वापर सोलर आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढला आहे. तर चीनमध्ये पण चांदीची मागणी वाढली आहे.
अजय केडिया यांनी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले की 1980 वा 2011 मध्ये चांदीचा भाव हा 50 डॉलर प्रति औंस इतका होता. रुपया डॉलरच्या तुलनेत तितका मजबूत नाही. त्यामुळे हे भाव 144-145 प्रति ग्रॅमपर्यंत पोहचू शकतात. सोने आणि चांदीची तुलना करता चांदी अजूनही सोन्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे चांदीत गुंतवणूक योग्य असल्याचे त्यांचे मत आहे.
सोने-चांदीचा दमदार परतावा
NSE Nifty Index मध्ये यंदा केवळ 6 टक्के वाढ दिसली. सोने आणि चांदीच्या किंमतीत 44% आणि 45% दरवाढ दिसली. गेल्या 12 महिन्यात दोन्ही धातुत जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी या कालावधीत 3.16% घसरून 25,118 वर बंद झाला. सणासुदीत दोन्ही धातुत पुन्हा उसळी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोने हे सुरक्षीत गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. त्याने 50 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळेच आपण सावध असणं आवश्यक असल्याचे केडिया यांचं मत आहे.
चांदी चमकणार
केडिया यांच्या मते चांदी ही लंबी रेस का घोडा ठरेल. चांदीला गरीबांचं सोनं म्हटलं जातं. केवळ दागिन्यांसाठीच नाही तर सोलर आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी पण चांदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे चांदीत अजून तेजी येईल असा केडियांचा अंदाज आहे. सोन्याच्या तुलनेत चांदी अजून खूप स्वस्त आहे. त्यामुळे ती खरेदी करणे पण सोन्याच्या तुलनेत महाग नाही. आतापासून चांदीतील थोडी थोडी गुंतवणूक, खरेदी भविष्यात फायदेशीर ठरेल असे त्यांना वाटते.
