EPFO : 7.8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, आता या महिन्यात ATM मधून PF काढा
withdraw PF from ATM : ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. एटीएम आणि युपीआय पेमेंटच्या माध्यमातून कधी पीएफ रक्कम काढता येईल याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. या महिन्यापासून ही सुविधा सुरू होणार आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ईपीएफओ जानेवारी 2026 पासून एटीएममधून पीएफ रक्कम काढण्याची सुविधा देण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, ईपीएफओची शिखर संस्था CBT ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात याविषयीची घोषणा करेल. सीबीटीची बैठकीत याविषयी मंजूरी देण्यात येईल. तर UPI पेमेंटमधून पीएफ काढण्याविषयीची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
ATM मधून पैसा काढण्याच्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्जफाटा करण्याची, ऑनलाई क्लेम करण्याची गरज पडणार नाही. त्यांची दीर्घकाळापासूनची प्रतिक्षा पण संपणार आहे. कर्मचारी थेट एटीएममध्ये जाऊन एटीएमच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढू शकतील.
CBT च्या एका सदस्याने मनीकंट्रोलला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, ईपीएफओच्या आयटी तंत्रज्ञ एटीएम व्यवहाराची सुविधा देण्यास तयार असल्याचे समोर येत आहे. एटीएममधून पीएफची किती रक्कम काढता येईल, याविषयीची एक अट असेल, एक मर्यादा ठरवण्यात येणार आहे. ती मर्यादा किती आणि काय असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मंत्रालयाची RBI सोबत चर्चा
कामगार मंत्रालयाने ईपीएफओची एटीएम सुविधा सुरू करण्यासाठी बँकांसोबत रिझर्व्ह बँकेशी पण चर्चा केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही सुविधा तात्काळ गरज पूर्ण व्हावी म्हणून देण्यात येत आहे. केंद्र सरकार आता कर्मचाऱ्यांना पीएफची रक्कम लागलीच मिळण्यासाठी अनुकूल आहे. ती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी फार अर्ज फाटे आणि प्रतिक्षा करावी लागू नये असे सरकारचे धोरण आहे. ईपीएफओ अंतर्गत आता 7.8 कोटी कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. यामध्ये ईपीएफओकडे 28 लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम ठेव आहे. 2014 मध्ये हा आकडा 7.4 लाख कोटी रुपये इतका होता.
अशी मिळेल सुविधा
EPFO सदस्य लवकरच एटीएम आणि युपीआय ॲपच्या मदतीने त्यांची पीएफ रक्कम काढू शकतील. या प्रक्रियेत एक विशेष ATM कार्ड देईल. हे एटीएम कार्ड PF खात्याशी लिंक असेल. या कार्डचा वापर करून थेट पीएफ रक्कम काढता येईल. ईपीएफओने मान्यता दिलेल्या एटीएममधूनच ही रक्कम निघेल. त्यासाठी EPFO युनिव्हर्सल खाते क्रमांकाशी (UAN) जोडलेल्या कार्डचा वापर करावा लागेल. तर UPI च्या मदतीने पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल. EPF सदस्य GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI प्लेटफॉर्मचा वापर करून सदस्यांना त्यांची पीएफ रक्कम काढता येईल.
