AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs PAK : फायनलमध्ये पाकड्यांना लोळवाच! अंतिम सामन्यात टीम इंडियाची कसोटी; गेल्या 18 वर्षात पारडे पाकच्या बाजूने

Asia Cup 2025 : टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपावर नाव कोरले आहे. तर पाकिस्तानला दोनदाच विजय मिळवता आला. पण कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला कच खाण्याचा आजार जडला आहे. ही आकडेवारी पाकिस्तानचे पारडे मजबूत असल्याचे दाखवते...

IND Vs PAK : फायनलमध्ये पाकड्यांना लोळवाच! अंतिम सामन्यात टीम इंडियाची कसोटी; गेल्या 18 वर्षात पारडे पाकच्या बाजूने
विजयी भव
| Updated on: Sep 26, 2025 | 3:10 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत खेळू नये. या ट्रॉफीतून बाहेर पडावे असा देशवासीयांचा सूर होता. पण BCCI काही तयार झाले नाही. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोनदा धुतले आहे. आशिया कप 2025 (Asia Cup 2025)मधील अंतिम सामना रविवारी दुबईमध्ये खेळला जाईल. दोन्ही देश तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील. टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपावर नाव कोरले आहे. तर पाकिस्तानला दोनदाच विजय मिळवता आला. पण कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला (team India) कच खाण्याचा आजार जडला आहे. ही आकडेवारी पाकिस्तानचे पारडे मजबूत असल्याचे दाखवते…

भारताचा आशियामध्ये रेकॉर्ड

आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली. तर 2016 पासून ही स्पर्धा पहिल्यांदाच टी-20 स्वरुपात खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत भारतीय संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. 8 वेळा या कपवर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. पाकिस्ताने दोनदा, श्रीलंकेने सहा वेळा आशिया कप जिंकला आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान कधीही अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले नव्हते.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 1985

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1985 मध्ये मेलबर्न येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी अंतिम सामना झाला होता. पाकिस्तानने 176 धावा केल्या होत्या. तर भारताने 17 चेंडून शिल्लक असताना 8 गडी राखत विजय मिळवला होता. त्यावेळी कृष्णमाचारी श्रीकांत आणि रवी शास्त्री यांनी अर्धशतक ठोकले होते.

ऑस्ट्रल आशिया कप 1986

1986 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रल आशिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत रोमांचक सामन्यात अखेरच्या षटकात एका गडी राखत सनसनाटी विजय मिळवला होता. भारताने 7 बाद 245 धाव केल्या होत्या. जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकत विजय मिळवला होता. हा सामना आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.

विल्स ट्रॉफी 1991

विल्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने 6 बाद 262 धावा केल्या होत्या. पण भारतीय संघ 190 धावांवर गुंडाळण्यात पाक संघाला यश आले होते. आकिब जावेदने भेदक मारा करत 37 धावा देत सात बळी घेतले होते.

ऑस्ट्रल कप 1994

शारजाह येथे झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचे वर्चस्व दिसले होते. या सामन्यात पाकिस्तानच्या 250 धावा झाल्या होत्या. भारताचा संघ 211 धावांवर तंबूत परतला होता.

सिल्व्हर ज्युबिली कप 1998

भारत,पाकिस्तान आणि बांगलादेशात सिल्व्हर ज्युबिली कप 1998 मध्ये खेळवण्यात आला होता. ढाका येथे पहिला सामना भारताने दुसरा पाकिस्ताने तर तिसरा अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने जिंकला होता.

पेप्सी कप 1999

पेप्सी कप 1999 मध्ये आयोजित करण्यात आला होता. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडले होते. बंगळुरू येथे हा सामना झाला. त्यात पाकिस्तानने 291 अशी मोठी धावसंख्या उभारली. पण भारतीय संघ 168 धावांमध्येच गारद झाला होता.

कोका कोला कप 1999

या सामन्यातही भारतीय संघाची हाराकिरी सुरूच होती. या सामन्यातही भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता. भारतीय संघ 125 धावांवरच तंबूत परतला होता. पाकिस्ताने कोणताही गडी न गमावता हा सामना अगदी सहज जिंकला होता.

टी 20 विश्वचषक 2007

24 सप्टेंबर 2007 मध्ये जोहान्सबर्ग येथे भारत -पाकिस्तान अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. भारताने 5 बाद 157 धाव केल्या होत्या. विजयाच्या अगदी जवळ पाकिस्तानी संघ 152 धावांवर सर्वबाद झाला होता.

किटप्लाय कप 2008

हा सामना अनेकांच्या स्मरणात राहिला. यामध्ये पाकिस्तानने तीन बाद 315 धावांचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. भारतीय संघाने हाकारे पिटत 290 धावा केल्या. 25 धावांनी भारताचा पराभव झाला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

पाकिस्तानने या सामन्यात 4 बाद 338 असा धावांचा डोंगर उभा केला होता. अंतिम सामन्यात टीम इंडियाला काहीच कामगिरी दाखवता आली नाही. भारतीय संघ सर्वबादग 158 धावांवर गुंडाळल्या गेला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा