40 वर्षांपुर्वी अदानींप्रमाणे फसले होते धीरुभाई अंबानी? कशी पलटली होती बाजी?

18 मार्चच्या संध्याकाळी दिवसअखेर हा शेअर 125 रुपयांवर बंद झाला. धीरूभाईंना असे इनपुट मिळाले होते की कोलकाता येथील ब्रोकर एका आठवड्यासाठी स्टॉक विकत आहे.

40 वर्षांपुर्वी अदानींप्रमाणे फसले होते धीरुभाई अंबानी? कशी पलटली होती बाजी?
धीरुभाई अंबानीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 3:05 PM

मुंबई : अदानी समूहाचे (Adani Group) मालक गौतम अदानी (Gautam Adani) सध्या चांगल्याच अडचणीत सापडले आहेत. 24 जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्गने (Hindenburg) दिलेला अहवाल त्याला कारण ठरला आहे. या अहवालानंतर अदानी समूहाचे (Adani Share Price) शेअर चांगलेच घसरले आहेत. फक्त सहा दिवसांत त्या शेअरमध्ये 45 टक्के घसरण झाली आहे. 10 दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता 21 व्या क्रमांकावर गेले आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

काय झाले होते रिलायन्सच्या बाबतीत

नोव्हेंबर 1977 ची गोष्ट आहे. धीरूभाई अंबानी यांनी आपली कंपनी रिलायन्सची शेअर बाजारात नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रिलायन्सने 10 रुपये प्रति शेअर दराने सुमारे 28 लाख इक्विटी शेअर्स जारी केले. रिलायन्सच्या शेअरची विक्री IPO ने केली. एका वर्षानंतर 1978 मध्ये रिलायन्स कंपनीच्या शेअरची किंमत 5 पटीने वाढून 50 रुपये झाली. त्यानंतर 1980 मध्ये एका शेअरची किंमत 104 रुपये झाली. 1982 मध्ये 18 पटीने वाढून ती 186 रुपयांपर्यंत रिलायन्सचे शेअर पोहोचले. 1982 मध्ये रिलायन्सच्या शेअर्सची किंमत प्रचंड वाढल्यामुळे कोलकाता येथील प्रभावशाली दलालांनी रिलायन्सला टार्गेट करणे सुरु केले. या दलालांना बिअर (Bear) म्हटले जाते. ते शेअरच्या किंमती पाडून पुन्हा खरेदी करतात अन् नफा कमवतात. हे काम आज हिंडनबर्ग करत आहे.

हे सुद्धा वाचा

कशी खेळली खेळी

18 मार्च 1982 रोजी ब्रोकर्सनी रिलायन्सच्या शेअर्सची शॉर्ट सेलिंग सुरू केली. जे हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये होत आहे. हिंडेनबर्गने स्वतः अदानी शेअर्सची शॉर्ट सेलिंग केल्याचे मान्य केले आहे. कोलकात्यात बसलेले शेअर बाजारातील दलाल रिलायन्सच्या शेअर्सचे भाव पाडत असल्याची माहिती धीरूभाई अंबानी यांना मिळाली होती. यानंतर, क्षणाचाही विलंब न करता अंबानींनी जगभरातील आघाडीच्या बुल ब्रोकर्सशी संपर्क साधला. आता अंबानी यांच्या बाजूने अनेक आघाडीच्या दलालांनी शेअर बाजारात उडी घेतली होती. एकीकडे कोलकात्यात बसलेले ब्रोकर बिनदिक्कतपणे शेअर्स विकत होते. तर दुसरीकडे अंबानी समर्थक बुल दलालचे शेअर्स खरेदी करत होते.

धीरुभाईंनी असा केला फंडा

18 मार्चच्या संध्याकाळी दिवसअखेर हा शेअर 125 रुपयांवर बंद झाला. धीरूभाईंना असे इनपुट मिळाले होते की कोलकाता येथील ब्रोकर एका आठवड्यासाठी स्टॉक विकत आहे. यामुळे धीरुभाईंनी याकडे लक्ष केंद्रीत केले की कोणत्याही प्रकारे आठवडाभर शेअरची किंमत फारशी कमी होऊ नये. यामुळे कोलकात्याच्या ब्रोकर्सना एकतर जास्त भावाने शेअर्स खरेदी करावे लागेल.

अंबानींच्या ब्रोकर्सने घेतले शेअर

तीन दिवसांत रिलायन्सचे 11 लाख शेअर्स विकले गेले आणि त्यापैकी सुमारे 8.5 लाख शेअर्स अंबानीच्या ब्रोकर्सने विकत घेतले. आता कोलकात्याच्या दलालांना घाम सुटला. कारण शेअरची किंमत 131 पेक्षा जास्त वाढली. म्हणजेच धीरूभाई अंबानींच्या जाळ्यात पुर्ण अडकले. अंबानींना कोलकात्यात बसलेल्या दलालांना धडा शिकवायचा होता, म्हणूनच ते 3 दिवस आपल्या जिद्दीवर ठाम राहिले.

आता अदानी काय करणार

आता प्रश्न असा पडतो की गौतम अदानीसोबत कोणी शॉर्ट सेलर गेम खेळत असेल, तर त्यांना हा गेम उलटवता येईल का. धीरूभाई अंबानी यांनी 40 वर्षांपूर्वी जे केले ते आज गौतम अदानी करू शकतील. धीरूभाई अंबानींनी जसा कोलकाता येथील दलालांना धडा शिकवला तो अदानी शिकवू शकतील का?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.