संकट कसलंही असूद्या ‘इमर्जन्सी फंड’ ठरणार तारणहार, जाणनू घ्या सविस्तर

उद्या तुमची नोकरी गेली तर? तुमच्या तुमच्या घरात कोणी आजारी पडले तर? उद्या आर्थिक मंदी आलीच तर? अशा वेळी तुम्ही काय करणार? स्वत:ला आर्थिक संकटातून कसं सावरणार? यासाठी सर्वात महत्त्वाचे असे आर्थिक नियोजन

संकट कसलंही असूद्या 'इमर्जन्सी फंड' ठरणार तारणहार, जाणनू घ्या सविस्तर
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 6:07 PM

आर्थिक सुरक्षा सध्याच्या काळात अतिशय कळिचा मुद्दा बनला आहे. प्रत्येकाला आपण आर्थिक सक्षम असावे असे वाटते. परंतु, प्रत्येकालाच ते शक्य नसते. कोरोना काळानंतर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांवरती आर्थिक संकट आले. परंतु या संकटातही टिकून राहिला तो आर्थिक नियोजन केलेला माणूस. या आर्थिक नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाची टर्म वापरली जाते ती म्हणजे आपत्कालीन निधी (Emergency Fund). ज्या माणसाकडे पुरेसा “इमर्जन्सी फंड” असतो तो माणूस कुठल्याही आर्थिक संकटातून सहज तारुन जातो. आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे या इमर्जन्सी फंडाचे नियोजन करायचे कसे? तर आपण समजून घेवूया…

तुम्हाला इमर्जन्सी फंडची गरज कधी पडू शकते?

1. तुमची काही कारणास्तव अचानक नोकरी गेली. 2. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही किंवा कोणी इतर व्यक्ती आजारी पडली. 3. तुम्हाला व्यवसायात तोटा झाला. 4. आर्थिक मंदी ही आणि अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी फंडची गरज पडू शकते. आता यातून सावरण्यासाठी इमर्जन्सी फंड तुमची कशा पद्धतीने मदत करु शकते ते पाहूयात.

किती इमर्जन्सी फंडची गरज आहे?

CA रोहित ज्ञानचंदाणी यांनी विश्लेषण केल्याप्रमाणे आपला दैनंदिन घरखर्च, दवाखाना, मुलांची शाळा फि, EMI, विम्याचा हप्ते (insurance premium) या सर्व गोष्टींचा किमान सहा महिने खर्च भागवता येईल एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असण्याची गरज आहे. समजा तुमचा महिन्याचा खर्च 50  हजार असेल तर तुमच्याकडे किमान ३ लाख रुपये इमर्जन्सी फंड असणे गरजेचे आहे.

 इमर्जन्सी फंड कुठे Invest करु शकता?

इमर्जन्सी फंडची Invest करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु, प्रामुख्याने ३ पर्यात सर्वात जास्त चर्चेत असतात.  बचत खाते (Saving Account) बचत खात्यामध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला 3-4 टक्क्यांपर्यंत परतावा (Returns) मिळू शकतो. मुदत ठेव (Fix Deposit) मुदत ठेवीच्या खात्यामध्ये जर पैसे ठेवले तर 5-7 टक्क्यांपर्यंत तुम्हाला परतावा मिळण्याची शक्यता असते. लिक्विड म्युच्युअल फंड, तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड. यामध्ये तुम्हाला 6-7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. CA रोहित ज्ञानचंदाणी हे सांगतात की लिक्विड म्युच्युअल फंड हा प्रकार सर्वात जास्त फायदा करुन देणारा आहे. यामध्ये तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो आणि तुम्ही केव्हाही तुमचे पैसे काढू शकता.

आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे शारिरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असते त्याप्रमाणे आर्थिक स्वास्थ्य देखील तितकेच महत्त्वाचे असते. आपल्याला चांगली झोप लागण्यासाठी आपण आर्थिक सक्षम असणे अतिशय गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे आपण शारिरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करतो, चांगला आहार घेतो, नियमीत डॉक्टरचा सल्ला घेतो त्याप्रमाणे आर्थिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी देखील सल्लागाराची गरज आहे. आपल्या सर्व गोष्टींचे आर्थिक नियोजन करण्यासाछी सल्लागार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे आता फिकिर सोडा आणि आपल्या आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या आणि आर्थिक सक्षम बना.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.