
मुंबई : शॉपिंगचा आजार हा आजकाल बळकावत आहे म्हणजेच अनाठायी शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. शॉपिंगच्या या आजाराचे नाव आहे मिनीमीलीज्म. आता मिनीमीलीज्म म्हणजे काय ? फायदे तोटे काय हे आता जाणून घेऊया. मिनीमीलीज्म म्हणजे कमी खर्च करणे नसून जे गरजेचे आहे त्याची खरेदी करणे इतकेच आहे. मिनीमलिस्ट आणि सिंपलिस्टमध्ये अंतर आहे.
मिनीमलिस्टमध्ये कोणत्याही वस्तुचा संग्रह केला जात नाही. यामधून कोणतेही चुकीचे आयुष्य नाही तर जितकी गरज आहे त्याप्रमणे जगणे असते.म्हणजेच चांगल्या ब्रॅंडचे आणि उत्तम दर्जाचे शूज खरेदी करायचे असतील तर 2 किंवा 3 जोडी शूज खरेदी करा. 2 जोडी शूज खरेदी करणे मिनीमलिज्म असतात तर 10 जोडी शूज हे मेटोरियलीज्म म्हणून गणले जातात.
यासाठी एक थिअरी समजून घेणे गरजेचे आहे. एका टाइम फ्रेममध्ये वस्तुचा वापर करणे असते. आणि जर वापर केला नाही तर त्या वस्तूची खरेदी करणे हे वायफळ असते. जर वस्तु खरेदी केल्यानंतर शूज, कपडे, इलेक्ट्रिक डिव्हाईस या वस्तूंचा वापर केला नाही तर कमी खर्च करून आणि गरज नसलेल्या वस्तू खरेदी न करता देखील तुमचे आयुष्य योग्य प्रकारे जगू शकता.त्यामुळे यापुढे शॉपिंग करताना लक्षपूर्वक आणि काळजी घेऊन खरेदी करा.
ई-साइट्स शॉपिंग वर गेल्यास शॉपिंग करण्यासाठी आकर्षित करतात.या साइट्सवर सतत सेल लागलेले असतात. त्यामुळे आपण किंमती कमी दिसल्याने गरज नसलेल्या वस्तु देखील खरेदी करतो. मॉलमध्ये गेल्यानंतर तिथे देखील शॉपिंग फेस्ट असतात. मोठ मोठ्या ब्रॅंड्सवर सेल लागलेला दिसतो. त्यामुळे गरज असेल तरच अशा ठिकाणी जावे.
मिनीमीलीज्म कसे व्हावे हे तर आम्ही तुम्हाला सांगितले आता याचे फायदे जाणून घेऊया. मिनीमीलीज्ममुळे तुमची बचत होईल. गुंतवणूक वाढेल. जे पैसे शॉपिंगमध्ये खर्च होतात ते गुंतवणूक म्हणून ठेवावे. शॉपिंग करण्यापेक्षा फिरण्यावर पैसे खर्च केल्यास वेगळा अनुभव येतो. तसेच शॉपिंग कमी केल्यास घरात जागा देखील वाचवू शकता. अधिक सामान जमा झाल्यास हवी असलेली वस्तु सापडणार नाही. पण कमी सामान घरी असल्यास मानसिक समाधान मात्र मिळेल.