
आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही खास योजना सांगणार आहोत. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही पारंपरिक एफडी किंवा पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. पण, आज आम्ही तुम्हाला काही खास पर्याय सांगणार आहोत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
पैसे गुंतवणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने आपली कमाई चांगल्या योजनेत गुंतवली पाहिजे. भारतीय टपाल कार्यालयामार्फत अनेक प्रकारच्या सरकारी योजना चालविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि खूप चांगला नफा कमावू शकतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा 2 योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक करून दरमहा हजारो रुपये कमवू शकता. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या योजनांबद्दल.
पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. 60 वर्षांवरील लोक या योजनेत गुंतवणूक करून चांगला नफा कमावू शकतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2 टक्के परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. याशिवाय या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे.
तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक 2.46 लाख रुपये व्याज मिळेल. यामध्ये तुम्हाला दरमहा 20,500 रुपयांचे व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही देखील पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम योजना आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियडही ५ वर्षांचा आहे. तर या योजनेवर 7.4 टक्के दराने परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून दरमहा व्याज मिळवू शकता.
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9250 रुपये व्याज मिळेल. यामध्ये तुम्हाला दरवर्षी 1.11 लाख रुपये व्याज मिळेल.
तुम्ही पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेत 15 वर्षांसाठी दरमहा 1000 रुपये म्हणजेच दरवर्षी 12,000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही पीपीएफ योजनेत एकूण 1,80,000 रुपयांची गुंतवणूक होईल. पीपीएफ योजना 7.1 टक्के दराने परतावा देते. यामध्ये मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 3,15,000 रुपये मिळतील. येथे तुम्हाला 1.45 लाख रुपयांचा नफा मिळेल.
( डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)