AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीचं वाटोळ करुन हिडनबर्ग कमवते पैसा? जाणून घ्या काय असतं ‘शॉर्ट सेलिंग’

जगभरात सध्या अदानी ग्रुपची चर्चा आहे. एका रिपोर्टमुळे गौतमी अदानी यांची चौथ्या स्थानावरुन थेट 22 व्या स्थानावर घसरण झाली आहे. हिडेनबर्गने दिलेल्या एका अहवालामुळे त्यांना मोठं नुकसान झालं आहे. पण हा अहवाल जाहीर करणारी कंपनी आहे तरी काय?

कंपनीचं वाटोळ करुन हिडनबर्ग कमवते पैसा? जाणून घ्या काय असतं 'शॉर्ट सेलिंग'
Short Selling firm
| Updated on: Feb 06, 2023 | 8:01 PM
Share

मुंबई : भारतातील एक दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) सध्या चर्चेत आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी Hindenburg चा अहवाल पुढे आला आणि कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरु झाली. एद दिग्गज कंपनीला अचानक मोठा फटका बसला. उद्योगक्षेत्रात याबाबत चर्चा सुरु असतानाच आणखी एक शब्द सध्या चर्चेत आला आहे. तो म्हणजे ‘शॉर्ट सेलिंग’. अदानी ग्रुपवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अमेरिकेची हिंडनबर् कंपनी ही स्वत:ला शॉर्ट सेलर फर्म असल्याचा दावा करते. पण Short Selling म्हणजे नेमकं काय चला जाणून घेऊया.

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडनबर्ग (US Firm Hindenburg) ने एक रिपोर्ट जारी केला आणि अदानी ग्रुप (Adani Group) वर कथित स्टॉक मॅनिप्यूलेशनचा आरोप लावला. याशिवाय अदानी ग्रुपला बँकाकडून मिळालेल्या कर्जावरुन देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. ज्याचा फटका गौतम अदानी यांना बसला. ‘Short Selling’ वर यानंतर आता चर्चा सुरु झाली. शॉर्ट सेलिंग Stock Market मध्ये व्यवहारा करण्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या घसरणीवर दाव लावतात.

Share Market मध्ये अनेक गुंतवणूकदार हे कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी एक रणनीती आखतात. ज्यामध्ये ते भविष्यात कंपनीच्या शेअर्स कसे वाढतील यावर दाव लावतात. कंपनीचे शेअर वाढल्यानंतर ते लगेच विकून टाकतात आणि पैसे कमवतात. याच्या उलट असतं ते म्हणजे शॉर्ट सेलिंग. ज्यामध्ये शेअरची खरेदी किंवा विक्री तेव्हा केली जाते जेव्हा त्याचे भविष्यात भाव घसरण्याची शक्यता असते.शॉर्ट सेलर स्वत:कडे शेअर नसताना देखील तो विकतो. एखाद्या कंपनीचे शेअर तो उधार घेऊन विकत असतो. पण यामध्ये जोखीम देखील भरपूर असते.

शॉर्ट सेलर कोणत्याही कंपनीचे शेअर यासाठी खरेदी करतो जो २०० रुपयांवरुन १०० रुपयांवर घसरेल. त्यानंतर तो दुसऱ्या ब्रोकरकडून या कंपनीचे शेअर उधारीवर घेतो. त्यानंतर तो हे शेअर दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकतो. जो तो 200 रुपयांना विकतो. कंपनीचा शेअर 100 रुपयांवर आल्यानंतर तोच शॉर्ट सेलर त्याच गुंतवणुकदारांकडून तो शेअर २०० रुपयांना शेअर करुन ब्रोकरकडून उधार घेतलेले शेअर्सचे परत करतो. अशा प्रकार त्याला 100 रुपयांचा फायदा होतो.

आतापर्यंत 16 कंपन्यांचा अहवाल

अदानी ग्रुपवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग देखील हाच खेळ खेळत असलाचा दावा केला जात आहे. अशा प्रकारे तो करोडो रुपये कमवू शकतात. नाथन एंडरसनने 2017 पासून हिंडनबर्च्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 16 कंपन्यांवर कथित गडबड केल्याचा आरोप केला आहे. अदानी ग्रुपच्या आधी त्यांनी Twitter Inc.वर आणलेल्या अहवालाची देखील चर्चा झाली होती.

कंपन्यांना टार्गेट करुन करोडोंचा नफा

हिंडनबर्ग देखील वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स कोसळतील यावर दाव खेळतात. रिसर्च फर्म असल्याने ते यावर अभ्यास करुन कंपन्यांवर स्वत: देखील पैसे लावतात. रिसर्च दरम्यान ते अशा कंपन्यांना शोधतात ज्यामध्ये अकाउंटिंगमध्ये काही गडबड किंवा स्टॉक मॅन्युपुलेशन किंवा मग मॅनेजमेंटमध्ये काहीतरी गडबड असेल. याबाबत कंपनी रिसर्च करुन एक अहवाल सादर करते. ज्यामुळे कंपन्यांना मोठा फटका बसतो.

Adani Group ला मोठा फटका

गौतम अदानी यांना आतापर्यंत 117 अरब डॉलरचा फटका बसला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामध्ये गौतम अदानी यांच्या उत्पन्नावर देखील परिणाम झालाय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते चौथ्या स्थानावरुन थेट २२ व्या स्थानावर पोहोचले आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.