Gold Silver Rate : सोन्यामुळे नशीब चमकणार, 2026 साली भाव होणार रॉकेट; मोठी भाकित समोर!

2025 हे साल सोने आणि चांदीसाठी फार चांगले राहिले. आता नव्या वर्षात हे दोन्ही मौल्यवान धातू कशी कामगिरी करणार, असे विचारले जात आहे. या दोन्ही धातूंच्या भविष्यातील भावाविषयी सांगण्यात आले आहे.

Gold Silver Rate : सोन्यामुळे नशीब चमकणार, 2026 साली भाव होणार रॉकेट; मोठी भाकित समोर!
gold and silver rate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 26, 2025 | 2:31 PM

Gold Silver Rate Future Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत चांगलीच वाढत आहे. विशेष म्हणजे 2025 हे साल सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूपच चांगले राहिले. या वर्षी सोने, चांदीने जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्याचा भाव साधारण 78 टक्क्यांनी वाढला. 20 डिसेंबर 2024 एमसीएक्सवर रोजी सोन्याचा भाव 75,233 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 22 डिसेंबर 2025 रोजी 1,33,589 रुपयांपर्यंत वाढला आहे. चांदीचा भावदेखील 144 टक्क्यांनी वाढला आहे. 20 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव 85,146 रुपये प्रति किलो होता. 20 डिसेंबर 2025 रोजी हा भाव तब्बल 2,08,062 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. अशा स्थितीत आगामी 2026 हे साल सोने आणि चांदीसाठी नेमके कसे असू शकते, असे विचारले जात आहे.

2026 साली सोन्याचा भाव वाढणार का?

आनंद राठी शेअर अँड स्टॉक्स ब्रोकरचे डायरेक्टर (कमोडिटिज) नवीन माथूर यांनी सोन्याच्या आगामी वर्षातील वाटचालीबद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या मतानुसार 2026 हे साल सोने आणि चांदीसाठी फार चांगले असणार आहे. नव्या वर्षात या दोन्ही धातूंमार्फत मिळणारे रिटर्न्स सामान्य असू शकतात. जागतिक पातळीवर व्याजदरात कपात, भू-राजकीय तणाव, सेंट्रल बँकांकडून सोने, चांदीची खरीदी या सर्व घडामोगी घडत असताना सोने स्थिर प्रदर्शन करेल. चांदीमध्ये मात्र चढ-उतार पाहायला मिळेल. 2026 सालाच्या शेवटपर्यंत हे दोन्ही धातू पॉझिटिव्ह झोनमध्ये अससतील, असे माथूर यांचे सांगणे आहे.

2026 साली सोने, चांदीची किंमत किती होऊ शकते?

रिद्धिसिद्धि बुलियन्सचे एमडी पृथ्वीराज कोठारी यांनी या धातूंच्या 2026 सालातील संभाव्य किमतीविषयी भाष्य केले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार पुढच्या वर्षी सोन्याचा भाव $5,000 ते $5,500 (साधारण ₹1.50 ते 1.65 लाख) रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर चांदीचा भाव $7580 (₹2.30 ते 2.50 लाख) रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)