Gold Rate : रुपया अजून कमजोर झाला, तर 2026 च्या अखेरपर्यंत प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी किती लाख मोजावे लागतील?

Gold Rate : युद्ध सुरु झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढतात. कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जातात. भारतीय नेहमीच सोनं खरेदीला पहिलं प्राधान्य देतात. इराण युद्ध सुरु झाल्यापासून एक वेगळा ट्रेंड दिसलाय. सोन्याचे भाव वाढण्याऐवजी घसरले आहेत.

Gold Rate : रुपया अजून कमजोर झाला, तर 2026 च्या अखेरपर्यंत प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी किती लाख मोजावे लागतील?
Gold
| Updated on: Mar 23, 2026 | 8:53 AM

इराण युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं. त्याच्या एकदिवस आधी 27 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.59 लाख रुपये होता. 21 मार्च म्हणजचे युद्धाच्या 22 व्या दिवसापर्यंत सोन्याच्या दरात 8 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर आता 1.47 लाख रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात 14 टक्के घसरण झाली असून 4,488 डॉलर प्रति औंस इतका भाव आहे. हा ट्रेंड थोडा वेगळा आहे. कारण युद्ध काळात उलट सोन्याचे भाव वाढतात.

सोन्यातील गुंतवणूक नेहमी सुरक्षित मानली जाते. युद्ध अनिश्चित असतं. त्यामुळे लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे किंमती वाढतात. 1990 चं आखाती युद्ध आणि 2003 च्या इराक युद्धात सोन्याच्या दरात वाढ दिसून आलेली. रशिया-युक्रेन युद्ध 2022 मध्ये सुरु झाल्यानंतर सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले पण नंतर कोसळले.

सोन्याचे भाव घसरण्यामागे चार कारणं

1 मजबूत डॉलर

डॉलर मजबूत झाल्यामुळे सोनं महाग वाटतं. त्यामुळे सोन्याची मागणी घटलीय. यावेळी सुद्धा डॉलर इंडेक्स वाढला आहे.गुंतवणूकदार डॉलरमध्ये पैसा लावतायत.

2. व्याजातील गुंतवणूक जास्त आकर्षक

कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे महागाईची भिती आहे. सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवलेले नाहीत. यामुळे डॉलर मजबूत झालाय. सोन्यातील गुंतवणूक कमी झालीय.

3. फायदा

2025 मध्ये सोन्याच्या दरात जवळपास 74 टक्के वाढ झालेली. गुंतवणूकदारांनी आता फायदा काढायला सुरुवात केली. त्यामुळे किंमतींवर दबाव आला.

4. मागणी घटली

सोनं महागल्याने ग्राहकांनी खरेदी कमी केली. मुंबईत दागिन्यांची विक्री जवळपास 75 टक्क्याने घटली आहे. त्याशिवाय आधीपासून जास्त स्टॉक असल्याने ज्वेलर्सही सोनं खरेदी कमी करतायत.

रुपया कमजोर झाला तर काय होईल?

एक्सपर्ट्समध्ये यावर वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते 2026 च्या अखेरपर्यंत सोनं 6,000 डॉलर प्रति औंस पर्यंत जाऊ शकतं. रुपया अजून कमजोर झाला, तर भारतात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 2 लाखापर्यंत पोहोचू शकतं. पण हे सर्व इराण युद्ध, तेलाची किंमत आणि डॉलरच्या मजबुतीवर अवलंबून आहे.

गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सचा सल्ला काय?

तुम्ही गुंतवणूकदार असाल तर घाबरण्याची गरज नाही. एक्सपर्ट्सनुसार एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी हळू-हळू गुंतवणूक करा. एकूण मिळून बाजारात चढ-उतार राहीलं.

Follow Us