AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : आज या शहरात स्वस्तात पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या कुठे बसेल खिशाला झळ

Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाने जोरदार उसळी मारली. क्रूड ऑईलचे भाव वधारले. राज्यात कोणत्या शहरात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळत आहेत, जाणून घ्या...

Petrol Diesel Rate Today : आज या शहरात स्वस्तात पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या कुठे बसेल खिशाला झळ
जाणून घ्या भाव
| Updated on: May 24, 2023 | 8:27 AM
Share

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल पंपावर 2000 रुपयांची गुलाबी नोट खपविण्याचा प्रकार सुरु आहे. काही पेट्रोल पंपधारकांनी तर वाहनाची टाकी फुल्ल केल्यास, कमिशन दिल्यास ही नोट स्वीकारण्याची शक्कल लढवली आहे. तर एका पेट्रोल पंप मालकाने दोन हजारांची नोट दिली म्हणून वाहनातील पेट्रोल काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या कोणत्याच झंझटीत न पडता पेट्रोल-डिझेल भरणे फायद्याचे ठरेल. जागतिक बाजारात कच्चा तेलाने जोरदार उसळी मारली. क्रूड ऑईलचे (Crude Oil) भाव वधारले. राज्यातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) स्वस्त झाल्या आहेत तर काही शहरात इंधन महागले आहे. तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्या एक क्लिकवर

क्रूड ऑईलची उसळी आज 24 मे रोजी, कच्चा तेलाने उसळी घेतली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 73.76 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 77.67 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.99 आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.28 तर डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.