RBI Gold : केंद्रीय बँकेने कुठे लपविले सोन्याचे भंडार! कोणावर स्वतःपेक्षा जास्त आहे भरवसा

| Updated on: Feb 17, 2023 | 5:35 PM

RBI Gold : वाढती महागाई आणि जगभरातील राजकीय संकटांमुळे अनेक मोठे देश त्यांच्या केंद्रीय बँकांमध्ये सोने जमा करत आहेत. आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण त्यात मागे नाही. मग आरबीआय इतके सोने नेमकं ठेवत कुठे असेल बरं?

RBI Gold : केंद्रीय बँकेने कुठे लपविले सोन्याचे भंडार! कोणावर स्वतःपेक्षा जास्त आहे भरवसा
साठा किती
Follow us on

नवी दिल्ली : संकटाच्या काळात सोने मदतीला येते ही म्हण फार जुनी आहे. संकटाच्या वेळी अनेक जण सोने तारण ठेवतात. सोन्याची मात्रा सर्वांनाच लागू होते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही सोन्याचा साठा करुन ठेवते. गेल्या अनेक वर्षांपासून आरबीआयने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी (Gold Reserve) करुन ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता आरबीआयने केवळ दोन वर्षांतच जवळपास 100 टन सोने खरेदी केले आहे. भारताकडे खूप मोठा सोन्याचा साठा झाला आहे. भारत जगातील टॉप -10 देशांच्या यादीत 9 व्या स्थानी आहे. मग इतके सोने केंद्रीय बँक ठेवते तरी कुठे? रिझर्व्ह बँकेने 2022 मध्ये एक रिपोर्ट जारी केला होता. त्यानुसार भारताकडे जवळपास 754 टन सोन्याचे भंडार आहे. गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सोने खरेदी करण्यात आली आहे. सोने खरेदीचा केंद्रीय बँकेचा हा वेग पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल. बँकेने सोने खरेदीचा फास्ट ट्रॅक रेकॉर्ड तयार केला होता.

केंद्रीय बँकेने केवळ एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या दरम्यान 132.34 टन सोने खरेदी करुन टाकले. एकाच वर्षात इतकी सोने खरेदी करणारी आरबीआय ही जगातील एकमेव केंद्रीय बँक ठरली. 2021 मध्ये आरबीआय सोने खरेदीत तिसऱ्या क्रमांकावर होती. तर 2020 मध्ये बँकेने केवळ 41.68 टन सोने खरेदी केले होते.

रिझर्व्ह बँक अधिकत्तम सोने हे बाहेरील देशात ठेवते. आरबीआयने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, भारताच्या एकूण सोने भंडारातील 296.48 टन सोने देशातच सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तर 447.30 टन सोने परदेशी बँकांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. यामधील सर्वाधिक हिस्सा बँक ऑफ इंग्लंडकडे ठेवण्यात आला आहे. तर काही टन सोने हे स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित आहे. येथील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये (BIS) ही रक्कम सुरक्षित आहे.

हे सुद्धा वाचा

जगभरात सोन्याचा एकूण साठ्यावर एक नजर टाकल्यास, सर्वाधिक सोने अमेरिकेकडे आहे. जगभरातील एकूण सोन्यापैकी जवळपास 75 टक्के साठा अमेरिकेकडे आहे. एका आकड्यानुसार, अमेरिकाकडे जवळपास 8,133 टन सोने आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी जर्मनी आहे. जर्मनीकडे 3,359 टन सोने आहे. चीन या यादीत सहाव्या स्थानी आहे. चीनकडे 1,948 टन सोने आहे. सोन्याचे भंडार असलेल्या टॉप-10 देशात आशियातील केवळ तीन देश आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आरबीआय इतके मोठे सोने खरेदी करते. तर ते परदेशी बँकांमध्ये कशाला ठेवते? हा साठा आरबीआय देशात का आणत नाही. तर एवढे मोठे सोने खरेदी करुन देशात आणणे सोपे नाही. त्याची सुरक्षा आणि वाहतूक करणे सोपे नाही.

जर आर्थिक संकट आले तर पुन्हा परदेशात सोने पाठविण्याची जोखीम घेता येत नाही. त्यावर पुन्हा मोठा खर्च येतो. 1990-91 मध्ये भारतावर आर्थिक संकट ओढावले होते. त्यावेळी भारताला 67 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये ठेवावे लागेल होते.