
देशाच्या राजकीय नेत्यांकडील संपत्ती आणि त्यांचे स्वीस बँकेतील खाते याची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची चर्चा असते. निवडणूक प्रतिज्ञापत्र नेते त्यांच्याकडील संपत्तीची लिखीत घोषणा करतात. पण त्यांच्या मुलांची किती संपत्ती आहे हे लवकर समोर येत नाही. सध्या असा कोणता नेता आहे की त्याच्या मुलाची संपत्ती सर्वाधिक आहे? समाज माध्यमावर अनेक नावं समोर येतात. पण एक असे नाव, ज्या विषयी अनेकांना माहिती नाही. कोण आहे ती श्रीमंत व्यक्ती?
कोणत्या नेत्याचा मुलगा श्रीमंतीत आघाडीवर?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह(Jai Shah) आता देशातीलच नाही तर जगातील क्रिकेट जगतातील मोठे नाव झाले आहे. 27 ऑगस्ट रोजी त्यांना कसलाही विरोध न होता ICC, जागतिक क्रिकेट परिषदेचे चेअरमन, अध्यक्ष करण्यात आले. अवघ्या 35 व्या वर्षी त्यांच्याकडे क्रिकेट जगताची मोठी जबाबदारी चालून आली. इतक्या कमी वयात मोठ्या पदावर पोहचणे सहज नक्कीच नाही. ते आतापर्यंतचे सर्वात तरुण चेअरमन, अध्यक्ष मानले जात आहेत.
एकूण किती संपत्ती?
जय शाह यांची संपत्ती किती असा सवाल अनेकांना पडला आहे. माध्यमातील काही दाव्यानुसार, जय शाह यांची एकूण संपत्ती 125 ते 150 कोटी रुपयांच्या घरात असू शकते. भारतात काही श्रीमंत राजकीय वारसदारांची चर्चा होते. त्यात त्यांचे नाव आघाडीवर आहे. जय शाह यांच्या कमाईचा मोठा वाटा हा कुसुम फिनसर्व या नावाच्या कंपनीतून येतो. या कंपनीत त्यांचा जवळपास 60% वाटा असल्याचे मानले जाते.
विना वेतन करतात काम
यापूर्वी ते टेंपल इंटरप्राईज नावाच्या कंपनीचे संचालक होते. पण ही कंपनी 2016 मध्ये बंद झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतक्या मोठ्या पदावर असतानाही जय शाह हे BCCI च्या सचिव पदाचे वेतन घेत नाहीत. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांच्या कंपन्या आणि गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच त्यांची संपत्ती कोटी रुपयांहून अधिक झाली असून एका अंदाजानुसार ती संपत्ती 125-150 कोटींच्या घरात असेल. देशात अनेक बड्या राजकीय कुटुंबाकडे मोठी संपत्ती आहे.