AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan-Aadhar Card Linking : पॅनकार्ड-आधारच्या लिकिंगमधून कोणाला मिळाली सूट? पॅनकार्डवरील चुकीची माहिती कशी कराल दुरुस्त?

Pan-Aadhar Linking | पॅनकार्ड आधारकार्डच्या लिकिंगमधून कोणाला देण्यात आली आहे सूट? पॅनकार्डमध्ये दुरुस्ती करायची असेल तर काय करावे लागेल, चला तर जाणून घेऊयात.

Pan-Aadhar Card Linking : पॅनकार्ड-आधारच्या लिकिंगमधून कोणाला मिळाली सूट? पॅनकार्डवरील चुकीची माहिती कशी कराल दुरुस्त?
या नागरिकांना मिळाली सूटImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 18, 2022 | 5:48 PM
Share

Pan Aadhar Card Linking | पॅनकार्ड हे भारतीय नागरिकांच्या आर्थिक घाडमोडींची जंत्रीच आहे. तर आधारकार्ड हा एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. हे दोन्ही कार्ड परस्परांशी लिंक करणे भारत सरकारने अनिवार्य केले आहे. आयकर विवरण पत्र भरण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी सरकारने आधार कार्डशी पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यक केले आहे. सरकारने त्यासाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ ही दिली आहे. आता ही मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतू, आताची मुदतवाढ ही सशुल्क आहे. त्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. कारण यापू्र्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती. पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत (Last Date) पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. ही मुदत ही 31 मार्च 2022 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील.

या नागरिकांना सूट

आधार कार्ड शी पॅनकार्ड जोडण्याची अजून सहा महिन्यांच्यावर मुदत आहे. ही मुदत ही 31 मार्च 2022 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील. आसाम, जम्मू आणि काश्मीर तसेच मेघालयाचे रहिवासी, अनिवासी भारतीय आणि 80 वर्षे वयावरील व्यक्ती यांना या लिंकिंग मधून सूट देण्यात आलेली आहे.

आधार पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ?

आयकर विभागाच्या ई-फायलिंग या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल याठिकाणी तुमची नोंदणी नसली तरी ई-फायलिंगसाठी तुम्ही पात्र असाल येथे तुम्हाला लिंकिंग करता येऊ शकते या पोर्टलच्या होमपेजवर त्यासाठीची लिंक दिलेली आहे या लिंकिंगसाठीचे विलंब शुल्क (1000रुपये) NSDL च्या वेबसाईटवर जाऊन भरावे लागेल विलंब शुल्क भरल्यावर आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर पुढील प्रक्रिया होईल विलंब शुल्क भरल्याची नोंद त्याठिकाणी रिफ्लेक्ट होण्याला काही अवधी लागू शकतो त्यासाठी नागरिकांना किमान चार दिवस थांबावे लागेल आधार आणि पॅनकार्डावरील तुमचे व्यक्तिगत नाव, जन्मतारीख, पत्ता मोबाईल क्रमांक आदी तपशील द्यावे लागतील हे तपशील परस्परांशी जुळत नसले, तर हे लिंकिंग होणार नाही

चुकीची माहिती अशी करा दुरुस्त

पॅनकार्डावरील तपशिलांची दुरुस्ती TIN-NSDL च्या संकेतस्थळावर करता येईल आधारवरील तपशिलाच्या दुरुस्तीसाठी UIDAI च्या संकेतस्थळावर जावे लागेल आधार केंद्रावरही तुम्ही चुकीची माहिती दुरुस्त करु शकाल आधार आणि पॅन कार्ड परस्परांशी लिंक झाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आयकर विभागाच्या एसएमएस सुविधेचा वापर करता येईल UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number> त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर