वेळेत तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचवणाऱ्या डिलीव्हरी बॉईजच्या या वेदना कोण ऐकणार?
अवघ्या काही मिनिटात आता ऑर्डर आपल्या घरापर्यंत पोहोचते. पण ही ऑर्डर वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून डिलिव्हरी बॉय आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात. देशात सध्या अशा कामगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण त्यांच्यासाठी देशात कोणताही कायदा नाही. त्यामुळे या डिलिव्हरी बॉईजच्या व्यथा आपण जाणून घेणार आहोत.

5 मिनिटात दूध, 8 मिनिटात किराणा आणि 30 मिनिटात जेवण. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटात गोष्टी तुमच्यापर्यंच पोहोचवल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या या गरजा वेळेत पूर्ण करण्यासाठी काही लोक आपला जीवही गमावतात.? कंपनीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी डिलिव्हरी बॉईज अपघाताचे बळी ठरत आहेत. देहराडूनमध्ये एका तरुणाचा वेळेवर जेवण पोहोचवण्याच्या प्रयत्नात जीव गेला होता. हे असं एकच उदाहरण नाहीये. असे अनेक अपघात रोज होत आहेत. Zomato, Swiggy, Blinkit, Zepto अशा प्लॅटफॉर्मशी जोडलेले डिलिव्हरी बॉईज त्यांच्या जीव धोक्यात घालून काम करत आहेत. लाल, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगाचे टी-शर्ट घातलेले डिलीव्हरी...
