FTA : साहेबांच्या देशासोबत मुक्त होईल का व्यापार? ऋषी सुनक यांच्या निवडीने भारताच्या आशा पल्लवित..

| Updated on: Oct 25, 2022 | 6:20 PM

FTA : भारत आणि इंग्लंडमधील मुक्त व्यापार धोरणामुळे भारताला असा फायदा होईल.

FTA : साहेबांच्या देशासोबत मुक्त होईल का व्यापार? ऋषी सुनक यांच्या निवडीने भारताच्या आशा पल्लवित..
व्यापार व्हावा मुक्त
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rushi Saunak) साहेबांच्या देशाचे पंतप्रधान होत असल्याचा व्यापारावर मोठा अनुकूल परिणाम होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार धोरणाचा (Free Trade Agreement) निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. सुनक यांच्यामुळे हा निर्णय झटपट होऊन देशाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यान मुक्त व्यापार करार या दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे अभिवचन देण्यात आले होते. या वर्षी एप्रिल महिन्यात इंग्लंडचे पूर्व प्रधानमंत्री बोरिस जॉनसन भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी ही कालमर्यादा आखण्यात आली होती.

दरम्यान सुनक यांनी ही भारत-इंग्लंड दरम्यान मुक्त व्यापार करारावर भर दिला आहे. त्यांनी तंत्रज्ञान आणि विमा क्षेत्रात दोन्ही देशांना व्यापारासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

जगातील मोठी लोकशाही म्हणून आपला भारताला पाठिंबा असल्याचे यापूर्वी सुनक यांनी म्हटले होते. त्यांनी जुलै महिन्यात मुक्त व्यापार धोरणाची वकिलीही केली होती.

भारतासोबत मुक्त व्यापार करण्यास लंडनमधील सिटी ऑफ लंदन कॉर्पोरेशनही उत्सूक आहे. सुनक लवकरच याविषयीचा निर्णय घेतली आणि दोन्ही देशात व्यापार वृद्धींगत होईल अशी आशा तिथल्या व्यापाऱ्यांना लागली आहे.

सध्याची राजकीय अस्थिरता आणि त्यानंतर पुन्हा स्थैर्यासाठीच्या घडामोडी भारतासाठी फायदेशीर असल्याचा दावा भारतीय निर्यातदार संघटनेचे उपसंचालक खालिद खान यांनी केला आहे.

तर जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाचे प्राध्यापक बिस्वजीत धर यांनी एक वेगळा तर्क दिला आहे. त्यानुसार, सुनक अगोदर देशातंर्गत मुद्यांवर अगोदर लक्ष्य केंद्रीत करतील आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील.

भारताचे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रस्तावित व्यापारी करार योग्य दिशेने जात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मुक्त व्यापार करारासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे.