आता गुंतवलेल्या पैशांचे काय होणार? ‘सहारा’ हरवलेल्या गुंतवणूकदारांचा सवाल

Subroto Roy Sahara | सहारा श्री सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर गुंतवणूकदार आता चिंतेत सापडले आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रात पण सहारा समूहात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि केंद्रीय सहकार खात्याच्या पुढाकारानंतर गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण झाली होती.

आता गुंतवलेल्या पैशांचे काय होणार? 'सहारा' हरवलेल्या गुंतवणूकदारांचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 2:51 PM

नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : सहारा समूहाचे सुप्रीमो सुब्रत रॉय यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर लागला आहे. आपला पैसा आता बुडणार तर नाही ना, हा त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. जर पैसा परत मिळणार आहे, तर तो कसा मिळणार, याविषयी पण त्यांच्या मनात प्रश्नांची मालिका सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लोकांना त्यांचा पैसा परत मिळण्याची आशा लागली होती. अनेक लोकांनी सहारा रिफंड पोर्टलवर पैसा परत मिळण्यासाठी अर्जफाटा केला आहे. पण सहारा श्री सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

4 कोटी गुंतवणूकदार

सहारा समूहात देशभरातील 4 कोटी लोकांनी गुंतवणूक केली आहे. सहारा रिफंड पोर्टलमार्फत 5000 कोटी रुपये परत करण्याचे आश्वासन यापूर्वीच केंद्रीय सहकार खात्याने दिले आहे. त्यानुसार या पोर्टलवर गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीचा तपशील भरला आहे. त्यातील अनेकांना ही रक्कम परत मिळण्याची प्रतिक्षा आहे. त्यात रॉय यांच्या निधनानंतर गुंतवणूकदारांना अधिक भीती वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

देशभरातील गुंतवणूकदारांना दिलासा

देशातील कोट्यवधी ग्राहकांचा पैसा सहारामध्ये अडकला आहे. त्यातील काही गुंतवणूकदार तर जीवंत ही नाहीत. उत्तर भारतासह पश्चिम बंगालपर्यंत गुंतवणूकदारांचे मोठे जाळे होते. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातील अनेक गुंतवणूकदारांचा पैसा अडकला होता. हे पोर्टल सुरु झाल्याने सहारा मधील पैसा परत मिळण्याची आशा वाढली आहे.

इतकी सोपी प्रक्रिया

  1. गुंतवणूकदारांना https://mocrefund.crcs.gov.in/ या रिफंड पोर्टलवर अगोदर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर या गुंतवणूकदारांचा पडताळा करण्यात येईल. गुंतवणूकदारांकडे गुंतवणुकीसंबंधीचे जी कागदपत्रे आहेत. तिचा पडताळा करण्यात येईल. 30 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
  2. ही प्रक्रिया झाल्यावर ऑनलाईन क्लेम करता येईल. 15 दिवसांत गुंतवणूकदारांना SMS येईल. त्यानंतर लागलीच गुंतवणूकदारांच्या खात्यात सहाराकडून रक्कम जमा करण्यात येईल. सहारात रक्कम गुंतवणूक केल्याविषयीचे सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
  3. चार सहकारी समित्यांकडील डेटा ऑनलाईन आहे. पोर्टलवर 1.7 कोटी गुंतवणूकदारांना यामुळे नोंदणी करणे सोपे होईल. या गुंतवणूकदारांच्या दाव्यांचा लवकरच निपटारा करण्यात येईल. 45 दिवसांच्या आता रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल.
  4. सहारा समूहातील सहारा क्रेडिट को-ओपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट को-ओपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधी गुंतवणूकदारांना हा दिलासा मिळणार आहे.
  5. पहिल्या टप्प्यात एकदम सर्व रक्कम मिळणार नाही. गुंतवणूकदारांना सुरुवातीला केवळ 10,000 रुपये मिळतील. ज्यांची गुंतवणूक केवळ 10 हजार रुपये आहे. त्यांचा प्राधान्याने विचार केला जात आहे. त्यानंतर अधिक रक्कमेच्या गुंतवणूकदारांचा क्रमांक येईल.​
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.