Richest Families in World 2025 : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत अंबानी कितव्या स्थानी ? विश्वासच नाही बसणार
ब्लूमबर्ग 2025 च्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेअर बाजार, जागतिक मागणी आणि मजबूत व्यावसायिक नेटवर्क ही प्रमुख कारणे आहेत. या यादीत वॉल्टन कुटुंब पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे तर मुकेश अंबानींचे कुटुंब..

आजच्या जगात भरपूर संपत्ती असणं, खूप श्रीमंत असणं, हे केवळ काही ठराविक व्यक्तींपुरती मर्यादित राहिलेलं नाही. तर आता मोठमोठी व्यावसायिक साम्राज्यं ही कुटुंबांच्या हातात अधिकाधिक केंद्रित होत आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही व्यावसायिक कुटुंबे जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देत आहेत. Bloomberg 2025 च्या नव्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांच्या (Richest Families in World 2025) संपत्तीमध्ये प्रचंड वाढ पहायला मिळाली आहे. 2025 या वर्षात जगातील टॉप 10 श्रीमंत कुटुंबे कोण आहेत, त्यांची एकूण संपत्ती किती आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत काय आहेत ही माहिती समोर आली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत अशी ख्याती असलेल्या मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबाचाही यात समावेश असून ते या यादीत कितव्या स्थानी आहेत, हे जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे.
Bloomberg च्या रिपोर्टनुसार :
2025 या वर्षात जगातील 25 श्रीमंत कुटुंबांची एकत्रित संपत्ती 2.9 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 358.7 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. यामागची प्रमुख कारणंही त्यांनी नमूद केली आहेत. शेअर बाजारात तेजी, वस्तूंची वाढती जागतिक मागणी, अनेक दशकांचा अनुभव आणि मजबूत व्यवसाय नेटवर्क, ही प्रमुख कारणं आहे. Bloomberg सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, गुंतवणूक आणि कुटुंबाच्या मालकीच्या आधारे कंपन्यांची क्रमवारी ठरवतं. या वर्षी, मेक्सिको, चिली, इटली आणि सौदी अरेबियातील काही नवीन कुटुंबे देखील प्रथमच यादीत सामील झाली आहेत.
कोण कोण आहे श्रीमंतांच्या यादीत ?
1) एकूण संपत्ती : 513.4 बिलियन डॉलर
मुख्य बिझनेस: Walmart
Walton कुटुंब हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहे. वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठी रिटेल चेन आहे, ज्याची 10 हजारांहून अधिक स्टोअर्स आहेत आणि दर आठवड्याला लाखो ग्राहक तिथे खरेदी करतात.
2) एकूण संपत्ती : 335.9 बिलियन डॉलर
मुख्य स्रोत: तेल आणि रॉयल इन्वेस्टमेंट
हे कुटुंब अबू धाबीचे राजघराणे असून आणि युएईच्या तेल संसाधनांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
3) एकूण संपत्ती : 213.6 बिलियन डॉलर
मुख्य स्रोत : तेल, सरकारी संपत्ती
सौदी अरेबियाचं राजघराणे या वर्षी तीन स्थान वर आलं असूव ते आता तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.
4) एकूण संपत्ती : 199.5 बिलियन डॉलर
मुख्य स्रोत : गॅस, इन्फ्रास्ट्रक्चर, गुंतवणूक
कतारचा हा शाही परिवार उर्जा आणि वैश्विक गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठी कमाई करतो.
5) एकूण संपत्ती : 184.5 बिलियन डॉलर
मुख्य बिझनेस: लग्झरी फॅशन
Birkin बॅग्ज आणि उच्च दर्जाच्या लक्झरी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेला Hermès ब्रँड हा कुटुंबाचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे.
6) एकूण संपत्ती : 150.5 बिलियन डॉलर
मुख्य बिझनेस: ऊर्जा, कृषी, केमिकल्स
Koch Industries ही अमेरिकेतील सर्वात मोठ्या प्रायव्हेच कंपन्यांपैकी एक आहे.
7) एकूण संपत्ती : 143.4 बिलियन डॉलर
प्रसिद्ध ब्रँड : M&M, Snickers
हे कुटुंब गेल्या कित्येक दशकांपासून फूड आणि चॉकलेट इंडस्ट्रीवर राज्य करतं.
8) एकूण संपत्ती : 105.6 बिलियन डॉलर
मुख्य बिझनेस: Reliance Industries
अंबानी कुटंब हे यादीत समावेश झालेलं एकमेव भारतीय कुटुंब आहे. श्रीमंतांच्या यादीते ते 8 व्या स्थानी आहेत.
9) एकूण संपत्ती : 85.6 बिलियन डॉलर
मुख्य ब्रँड: Chanel Chanel सारख्या प्रीमियम फॅशन ब्रँडसह या कुटुंबालाजागतिक मान्यता मिळाली आहे.
10) एकूण संपत्ती : 82.1 बिलियन डॉलर
मुख्य बिजनेस: Thomson Reuters
हे कुटुंब माध्यम आणि माहिती सेवा क्षेत्रात आघाडीवर आहे.
