AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरबीआयच्या नव्या नियमामुळे देशातील निम्मे ATM बंद होणार?

मुंबई : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण गेल्या काही दिवसांपासून देशात एटीएमची संख्या कमी होत आहे. आरबीआयने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे देशातील निम्मे एटीएममध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘ब्लूमबर्ग’ […]

आरबीआयच्या नव्या नियमामुळे देशातील निम्मे ATM बंद होणार?
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण गेल्या काही दिवसांपासून देशात एटीएमची संख्या कमी होत आहे. आरबीआयने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे देशातील निम्मे एटीएममध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमात एटीएम मशीनबाबत काही नवे नियम व अटी लागू केल्या आहेत. या कारणामुळे सर्व बँकांना आणि एटीएम मशीनमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागत आहे. हे बदल करण्यासाठी बँकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने, काही बँकांनी एटीएम मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेक ठिकाणी बँकांचे एटीएम बंद करण्यात आले आहे. असं असलं तरीही, एटीएमद्वारे पैसे काढण्याचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

गेल्यावर्षी देशातील काही महत्त्वाच्या आर्थिक संस्थांनी एटीएम बंद होण्याबाबत अंदाज व्यक्त केला होता. कॉन्फिडेरेशनल ऑफ एटीएम इंडस्ट्रीने Confederation of ATM Industry (CATMi) या संस्थेने गेल्यावर्षी भारतात 2019 मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त एटीएम बंद होऊ शकतो असा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात देशातील एटीएमची संख्या कमी झाली आहे. देशात एकूण 2 लाख 38 हजार एटीएमची नोंदणी करण्यात आली होती. मात्र त्यातील जवळपास 1 लाख 13 हजार एटीएम बंद करण्यात आले आहे. असेही या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

देशात एटीएमद्वारे पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र देशात एटीएम मशीनच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. असा दावा आरबीआयने केला आहे. तर आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या पाहता त्या तुलनेत एटीएमची संख्या फार कमी आहे.

दरम्यान देशातील काही महत्त्वाचे एटीएम जर बंद झाले, तर मात्र सर्वसामान्यांना पैसे काढण्यासाठी मोठ्या हाल-अपेष्ठा सहन कराव्या लागू शकतात. तसंच या गोष्टीचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही जाणवू शकतो.

आरबीआयचे एटीएमबाबत नवे नियम काय?

  • सर्व एटीएममध्ये दरवेळी 100 करोडपेक्षा जास्त रक्कम असणं गरजेचं आहे.
  • एटीएममध्ये सीसीटिव्ही, जीपीएस, वायरलेस कम्युनिकेशन आणि हुटर्स असणं अनिर्वाय आहे.
  • सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक असणे गरजेचं आहे.
  • एटीएममध्ये पैशांची ने आण करणाऱ्या व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक असणे गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, या 7 कामांसाठीही करु शकता

एटीएममध्ये पैसे अडकले असतील, तर हा नियम माहित असू द्या

‘या’ आठ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, नक्कीच फायदा मिळेल

मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.